Dada Bhuse : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांना टवाळखोर व्यक्तींपासून होणारा त्रास रोखण्यासाठी यापुढे पोलिस सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. शाळा प्रशासनाने संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज देवून सुरक्षेची वेळ निश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता.२१) तातडीने जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. (Dada Bhuse statement of Police security to schools colleges )