Gurumauli Annasaheb More : जगात माझे हित किंवा अनहित करणारा कोणी असेल तर तो माझा मीच आहे. आपल्याला वाटते, की दुःख, आजारपण आपण टाळू शकत नाही, म्हणजे ‘मी कर्ता’ ही आपली भावना खोटी असते. मालकी नसताना घराची मालकी दाखविण्याचा आपण प्रयत्न करतो. प्रापंचिक व्यक्तीत आणि संतांमध्ये हाच फरक आहे, की संत हे कर्तेपण भगवंताकडे देतात आणि प्रापंचिक लोक ते आपल्याकडे घेतात. (nashik Gurumauli Annasaheb More marathi news)
‘स्वामी कर्ता’ म्हटला की सुख, कल्याण सर्व काही आले. सर्व स्वामींकडे सोपवा, त्यातच खरे हित आहे, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी आज सांगितले. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग प्रधान केंद्रात रविवारी (ता. २५) सत्संग व मार्गदर्शन सेवेप्रसंगी गुरुमाउली बोलत होते. गुरुमाउली म्हणाले, की मधुमेह असताना गोड खायचे नसते, तरी गोड खाऊन आपले अनहित आपणच करून घेत असतो.
आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात. १. कुपथ्य पाळणे, २. पथ्य सांभाळणे आणि ३. औषध घेणे. तसेच, भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात. एक गोष्ट- दुःसंगती, अनाचार, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणे.
दुसरी गोष्ट- सतसंगती, सद्ग्रंथसेवन, सद्विचार आणि सदाचार असणे. तिसरी गोष्ट- नामस्मरण करणे. हेच औषधसेवन आहे. आपल्या जिभेला नामस्मरणाची सवय लावून घ्या. पहिले-पहिले नामस्मरणात विसर पडेल; पण सवयीने आठवेल. जसे पाणी गोठल्यावर ते बर्फ होते, तसे नामस्मरणाने श्रद्धा घट्ट होते.
त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे जिथे श्री स्वामी, तिथे सेवेकरी व जिथे सेवेकरी असतो, तिथे त्यांचे नामस्मरण आणि स्वतः स्वामी महाराजच असतात, असा विश्वास गुरुमाउली यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना दिला.
श्री स्वामी समर्थ महापूजा, प्रश्नोत्तरे, शंका निरसन मार्गदर्शनानंतर पालखी सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या वेळी अण्णासाहेब मोरे उपस्थित होते. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.