Gurumauli Annasaheb More : ज्ञानाचे पवित्र महाउज्ज्वल लावण्य म्हणजे समस्त दृष्टी : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : पंचामृतात स्नान करून गंगाजलाने स्वच्छ व्हावी, असा बोध होय, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. ३०) सांगितले.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : ‘देवी सप्तशती’नुसार महासरस्वती चंडमुंड विनाशिनी दुर्गा आहे. पौराणिक संदर्भानुसार देवी सरस्वती ‘वीणा-पुस्तक रंजित हस्ते’, ‘श्वेतवर्णा’, ‘तुषारहार धवला’, ‘श्वेत आभरणा’, ‘श्वेत पद्मासना’, ‘कुर्वेन्दुसम’, ‘श्वेतहंसवाहिनी’ आहे. हे रूप युगानुयुगे जनमानसात रुजले, रूढ झाले आहे. ज्ञानाचे अत्यंत पवित्र, शुभ्र, महाउज्ज्वल लावण्य म्हणजे समस्त दृष्टी, पंचामृतात स्नान करून गंगाजलाने स्वच्छ व्हावी, असा बोध होय, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. ३०) सांगितले. (Gurumauli Annasaheb More holy great radiance of knowledge is all vision )

दिंडोरी प्रणित प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाउली म्हणाले, की ज्ञानाने प्राप्त दृष्टी ‘स्व’च्या पलीकडे सर्वांच्या कल्याणाचा वेध घेत सर्वात्मक आपुलकीने जीवनाशी एकरूप होते, तेव्हा दृष्टीला, वाणीला, कृतीला सरस्वतीचे वरदान प्राप्त होऊन ‘परब्रह्म पाहिले मी डोळां’ असा आनंद-सोहळा सुरू होतो.

विद्येचे लेणे अशा भावनेने ल्यायचे, हीच ज्ञानसाधना होय. अशा संशय रहित विद्या साधनेसाठी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आवश्यक आहे. ‘ज्यांच्या वरप्रसादें करून। मूढां होय शास्त्रज्ञान। त्या समर्थांचे चरण। वारंवार नमितसे।’ दत्तावतारी श्री यतिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेने ज्ञानचक्षू उघडतात व लोककल्याणाच्या उर्मीत कृतितत्त्वात उचंबळू लागतात.

त्र्यंबकेश्वर क्षेत्री साकारलेले श्री गुरुपीठ श्री स्वामी महाराजांच्या चैतन्याचे अखंड निवासस्थान आहे. दश महाविद्यांच्या तेजाचा स्रोत येथे नित्य प्रवाहित आहे. ‘श्री’ यंत्राची दैवी शक्ती येथे सामावली आहे. सेवाभावनेने, अनन्य श्रद्धेने येणाऱ्यास येथे प्रचीती होते. हठयोगादि कठीण, असाध्य साधनेने जे अप्राप्य ते आत्मज्ञान अनुभवसिद्ध बनविण्याची किमया असलेल्या गुरुपीठाच्या प्रत्येक कणाकणात सरस्वती व्याप्त आहे. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : गोड, हितकारक असेच प्रत्येकाने बोलावे! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

साध्या दृष्टीचा विषय असलेले नामरूपादि विश्व सोडून त्यात नित्य सामावलेले शाश्वत चैतन्य, अखंड परब्रह्मत्व, शुद्ध अंत:करणाच्या सेवेकऱ्याला अनुभवता यावे, त्यातून आनंदाच्या लहरी त्यास सर्वत्र प्रसारित करता याव्यात, यासाठी हे गुरुपीठ साकारले आहे. साध्याभोळ्या संसारी माणसांच्या हृदय संवेदनेशी ते जोडलेले आहे व याच माणसांच्या उद्धारासाठी सज्ज झालेले अपूर्व सिद्धपीठही ते आहे.

मन:शांतीसाठी, जीवनाच्या सकारात्मक उर्जेसाठी, मनाच्या उन्नतीसाठी या गुरुपीठास भेट देऊन त्याच्या प्रांगणातून मनातल्या मनात ब्रह्मगिरीला साद द्या. शिवरूप व गुरुरुपाच्या अद्वैताची प्रचीती अनुभवा. श्री स्वामी महाराज म्हणाले होते, ‘डोंगर बोलतील, तेव्हा मी उठेन’. डोंगरांना बोलते करणारी माणुसकी, कारुण्य, परमप्रेम सेवेकऱ्‍यांच्या हृदयात वसले की सर्वत्र सर्व वेळ श्री स्वामी महाराजांच्या अस्तित्वाचा कृपामय अनुभव येईल. त्यासाठीची साधना अखंडपणे या गुरुपीठात सुरू आहे.

परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य अस्तित्त्वाची अनुभूती देणारे हे चैतन्यधाम आहे. परम आनंदाचे वसतिस्थान असलेले श्री गुरुपीठ अपूर्व मन:शांतीचा प्रत्यय, विवेकाचे बळ व निर्धाराची शक्ती देणारे आहे. सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर त्यांनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : परीक्षा एक तंत्र, एक पद्धती, एक कौशल्य : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.