Gurumauli Annasaheb More : परीक्षा एक तंत्र, एक पद्धती, एक कौशल्य : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : परीक्षा एक तंत्र, एक पद्धती व एक कौशल्यही आहे. परीक्षा आव्हान म्हणून स्वीकारावी व आपल्या सर्व गुण, शक्तींचा एकत्रित उपयोग करून ते आव्हान जिंकावेही.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

Nashik News : परीक्षा एक तंत्र, एक पद्धती व एक कौशल्यही आहे. परीक्षा आव्हान म्हणून स्वीकारावी व आपल्या सर्व गुण, शक्तींचा एकत्रित उपयोग करून ते आव्हान जिंकावेही. माणूस कोणतीही गोष्ट करायची म्हणून करीत नाही, तर त्यात नावीन्य, सौंदर्य, वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो. या दृष्टीने परीक्षा ही महत्त्वाची प्रक्रिया आहे, असे दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. २२) सांगितले.

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, की परीक्षेत नीट-नेटके सुंदर लिहायला खूप महत्त्व आहे. सुंदर, स्वच्छ अक्षर, नीटनेटकी सोपी वाक्यरचना, व्यवस्थित समास सोडलेला, वळणदार अक्षराबरोबर शुद्धलेखन, मुद्देसूद लिहिलेली उत्तरे, सुटसुटीत लिखाण, खाडाखोड नसणे.

मुख्य मुद्द्यांना रेखांकित केलेले, लिहिताना उत्तरापुढे प्रश्नांचे क्रमांक योग्य लिहिलेले, प्रत्येक प्रश्न स्वतंत्र पानावर सुरू केलेला, सुटसुटीत लेखन व मांडणी, या सर्वांचा समग्र परिणाम चांगला होऊन अधिक गुण मिळण्यास मदत होते. म्हणून उत्तरपत्रिका अधिक चांगली लिहिण्यावर भर द्यावा, ते कौशल्य आत्मसात करावे. यामागे एक भूमिका अशीही आहे, की मी ही उत्तरपत्रिका सोडवितो/लिहितो आहे.

माझ्याकडून जे काम होईल, ते सुंदर व नीटनेटके, प्रशंसनीय झालेच पाहिजे. कारण, मलाही ते तसेच पाहायला आवडते. माझे हात हे काम करणार आहेत. मग या हातांनी होणारे काम सुंदर झाले पाहिजे. अशी प्रेरणा असेल तर आयुष्यातली सर्व छोटी-मोठी कामे सुंदर, व्यवस्थित पूर्ण होतील. कामांमध्ये भेदभाव, उजवे-डावे राहणारच नाही. अशा कामात आपाआप मन एकरूप होईल. कारण, एकाग्रतेशिवाय कोणतीही गोष्ट सुंदर घडत नाही. ते घडविण्याचा, काम चांगले करण्याचा आनंद मिळेल.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : ‘वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराई जाने रे।’ : गुरुमाउली आण्णासाहेब मोर

या आनंदामुळे आयुष्य कंटाळवाणे होणार नाही. मग मानसिक, बौद्धिक थकवा येण्याचे, निराश होण्याचे कारणच काय? कामात मन ओतून प्रत्येक काम जर नीटनेटके केले तर त्याचे फायदे इतर दृष्टीनेही होतात. सगळ्या गोष्टी वेळेवर मिळतात, कामे वेळेवर होतात. आपल्या हातून होणारे काम आपली ओळख बनते. त्यातून आपले माणूसपण व्यक्त होते. म्हणून उत्तरपत्रिका लिहिणेही एक निर्मिती घडविणे, अशा भावनेने केलेले कार्य आहे.

त्यात बुद्धी, कौशल्य, तन्मयता, जबाबदारी, अभिरुची यांचा सहभाग आहे, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले. सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : खरिपाचा, सुगीचा हंगाम ‘कृषी-चातुर्मास’ : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.