Gurumauli Annasaheb More : भक्तीचा गाभा सर्वात्मकता, अभेदता : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : माणसांनी निर्माण केलेल्या भेदभावाच्या, संकुचित विचारांच्या भिंती जमीनदोस्त करून संतांनी समानताधिष्ठित मानवता हेच भक्तीचे लक्षण घोषित केले.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : माणसांनी निर्माण केलेल्या भेदभावाच्या, संकुचित विचारांच्या भिंती जमीनदोस्त करून संतांनी समानताधिष्ठित मानवता हेच भक्तीचे लक्षण घोषित केले. भक्तीचा गाभा सर्वात्मकता, अभेदता आहे. माणसाचे माणूसपण टिकवणारे साधन, ईश्वरावर श्रद्धा व ईश्वर सेवा आहे. प्रत्येक माणसामध्ये दैनंदिन जीवनातल्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळा, एक विशिष्ट आत्मिक जीवन इच्छिणारा माणूस असतो. ( Core of Bhakti is Universality Immutability )

जो देण्याघेण्याच्या व्यवहार जगापेक्षा, देहाश्रित गरजांवर आधारलेल्या सुख-दु:खाच्या भावनेपेक्षा पूर्ण वेगळा असतो, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. २१) सांगितले. दिंडोरीप्रणीत प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला.

गुरुमाउली म्हणाले, की कोरडे पांडित्य किंवा रुढीबद्ध उपचार, व्यवहार ही तहान-भूक भागवत नाही. तिच्या तृप्तीसाठी, आत्मिक व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी सद्‌गुरूंची‌ आवश्यकता असते. मातीतून उगवलेल्या पिकांमध्ये, झाडाच्या फळांमध्ये माधुर्य, रस भरण्याचे, त्यांना परिपक्वता देण्याचे, त्यांना पोषणदायी बनवण्याचे कार्य जसा तेजस्वी सूर्य करतो. तसे सद्‌गुरूं माणसाच्या जगण्याला आनंदाची समरसता, परिपक्वता, सामाजिक बांधिलकीचे भान, मानवतेचे ध्येय मिळवून देतात.

सद्‌गुरूंचे सगुण स्वरूप श्रीदत्तात्रेय व त्यांचे अवतार आहेत. तेच निर्गुण स्वरूपात अखिल ब्रह्मांड-व्याप्त परमज्ञान, गुरुतत्त्व आहेत. श्री दत्तात्रेयाच्या त्रिमूर्तीत सामावलेले शिवस्वरूप आदिगुरू, नित्य, बोधात्मक, सर्व अतृप्ती व दोषांचे शमन करणारे शंकरस्वरूप आहे. वक्र चंद्रमा जसा शिवाच्या माथी धारण करताच वंदनीय बनतो, तसे दोषी, पतीत, हीन-दीन, निराश, निष्क्रिय सद्‌गुरूंचा आश्रय प्राप्त करून महानतेचे धनी बनतात. सद्‌गुरू अनंत दृष्टींचे प्रकाशक आहेत, चित्ताचा महाविस्तार करविणारे आहेत. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : संगतीचा परिणाम मनावर होतो! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

या भावनेने संतांनी सद्‌गुरू महिमा आकांठ वर्णिली आहे. भारतीय मनाने ईश्वराला सद्‌गुरू बनवण्याची किमया घडवून आणली आहे. ही किमया घडवणारी छोटी मुक्ताई चारशे वर्षे जगलेल्या अहंकारी चांगदेवाची सद्‌गुरू, प्रकाशशलाका बनते. सामान्य माणूस योग्यासारखा नित्यपूर्ण आदित्य कधी बनत नाही, तर तो भक्तिसेवा अमृताचा धनी, नश्वरता-अनश्वरतेच्या झुल्यात दोलायमान शीतल-शांत पौर्णिमेचा चंद्र बनण्याची आकांक्षा व्यक्त करतो.

श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ऋषीला कृषीकडे वळवणारी व कृषीला ऋषीपण देणारी अद्भुत सेवा आहे. श्री स्वामींची सेवा विज्ञानाचा प्रत्यय देणारी, ज्ञानी बनवणारी सेवा आहे. ईश्वरप्रेम व ईश्वरसेवा विरहित मनोभाव, विचार माणसाला अहंकारी, एकांगी बनवतात. असा माणूस स्वत:ला सर्वश्रेष्ठ मानून ईश्वराचा तिरस्कार जेव्हा करतो, तेव्हा त्यातून हजारो दुर्योधन किंवा दैत्य निर्माण होऊन जनतेचे जगणे असह्य, आतंकित करतात.

हे थांबविण्यासाठी ‘श्री स्वामी सेवा’ समाजात रुजणे, वाढणे आवश्यक आहे. कारण ती सर्व धर्मीयांना, पथांना, सर्व मानवांना सहज प्रेमाने आपलेसे करणारी, मानवतेच्या सूत्रांनी बांधणारी परमभावभक्ती आहे. मानवाने स्वयंप्रेरणेने घडवलेली स्वत:ची लख्ख नैतिक, आंतरिक मनोरचना, प्रवृत्ती म्हणजे आध्यात्मिकता होय. ही आध्यात्मिकता देण्याचे, वाढवण्याचे कार्य दिंडोरी मार्ग करत आहे.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : गोड, हितकारक असेच प्रत्येकाने बोलावे! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

आज माणसांची आंतरिक व्यवस्था व नैतिकता जेवढी वाढेल, तेवढी बाह्य व्यवस्थांची, बाह्य आयोजनांची गरज संपेल, त्यातून राष्ट्राला उत्तम सामाजिक, आर्थिक नियोजन करायला उसंत मिळेल, अशी सकारात्मक विचारसरणी सार्वत्रिक बनवण्यासाठी भक्ती, सेवेची, उत्तम विवेक घडविणाऱ्या अध्यात्माची नितांत गरज आहे. असेही, गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

सुरवातीला सकाळी त्यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : जनतेने एकत्रित होऊन संकल्पाने नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.