Gurumauli Annasaheb More : दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. १८) सांगितले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, सद्गुरूंचे ऐकल्याने फायदा आपलाच होतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे, असे सांगतात आणि त्यासाठी ‘सत्संग करा, अखंड नामस्मरण करा’ म्हणून सांगत असतात. ( Learn to be charitable from world )
ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. संत तुकारामांनी तर आपल्याला उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे, की ‘नामस्मरणासारखे सोपे साधन नाही.’ त्यांनी हे साधन आपल्या कल्याणाकरिताच सांगितले आहे. ते आपण केले काय किंवा नाही केले काय, लाभ व नुकसान आपलेच आहे याचा विचार करावा. आपल्याला भवरोग झाला आहे, अशी आपल्याला आधी खात्री झाली असावी, म्हणजे निम्मे काम झाले.
भवरोग झाला आहे, असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. संसारात सुख नाही, असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या प्रयत्नाला आपण लागले पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. गुरुमाउली यांनी मार्गदर्शनात दाखला देताना सांगितले, की एका व्यक्तीने ३३ वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला ‘परब्रह्माची पूजा आणि सेवा कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो.’ ‘नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. (latest marathi news)
म्हणजे आपलेपण बाजूला ठेवावे लागते.’ आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता वरिष्ठांच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांना ठेवले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज श्रेष्ठ आहेत. कारण ते मनुष्यासारखे स्वार्थी नाहीत. ते अत्यंत निःस्वार्थी असल्याने माझे हित बघणारे आहेत म्हणून मी आता आनंदात आहे. प्रत्येकाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच मानवी जीवनाचे सार आहे, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.
सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंकांचे निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.