Gurumauli Annasaheb More : श्री स्वामींचे स्मरण हा प्रपंचातला निव्वळ नफा! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : परब्रह्म श्री स्वामी महाराजांचे स्मरण हा प्रपंचातला निव्वळ नफा होय, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी रविवारी (ता. ७) दिंडोरी येथे सांगितले
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

नाशिक : देहासंबंधीची नाती पती-पत्नी, आई-वडील, बहीण-भाऊ वगैरे याबाबत प्रत्येकाचे कर्तव्य आहेच; पण मनुष्यत्वाचे कर्तव्य आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे होणे. नोकरी करणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजवावे, घरातल्या मंडळींनी आपले काम नीट मन लावून करावे हे सर्व करून उरलेला सर्व वेळ श्री स्वामी महाराजांच्या स्मरणात घालवावा.

आपण एखादा व्यापार केला तर त्यातील निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो, त्याचप्रमाणे परब्रह्म श्री स्वामी महाराजांचे स्मरण हा प्रपंचातला निव्वळ नफा होय, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी रविवारी (ता. ७) दिंडोरी येथे सांगितले. (nashik Gurumauli Annasaheb More news)

दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्रात आज साप्ताहिक संवाद तथा शंका निरसन सत्संग झाला. या वेळी गुरुमाउली बोलत होते. सकाळी प्रारंभी श्री स्वामी समर्थांचे स्मरण व पूजनाचा कार्यक्रम झाला. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी नामस्मरण केले. त्यानंतर मार्गदर्शन व प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला.

गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले, की आपण पुष्कळ वाचले, ऐकले; पण ते कृतीत उतरले नाही. कृतीशिवाय समाधान नाही. ज्याने कृती केली, त्यानेच ऐकले असे समजावे. देह हा अनित्य आहे, तरी आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत प्रत्येकाची धडपड सुरू असते, ती समाधान मिळण्यासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या आली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळाला, विवाह केला, मुले-बाळे झाली. ज्या-ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले, त्या-त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले, तरीही समाधान मिळत नाही. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत, हे खरे असले तरी देहाच्या सुखाकरिता जन्मभर आटापिटा करणे योग्य नव्हे. याचा फायदा आपल्याला होत नाही. देह गेला की सगळे जाते!

कृतीशिवाय बोलणे व्यर्थ आहे. स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखेच दिसतात; पण त्यांच्यात फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे, तर स्वैरवर्तन हे अपवित्र आहे. आपल्याला स्वातंत्र्य फक्त स्वत:ची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे प्रपंचाच्या बाबत आपल्याला बंधने आहेत आणि ती आवश्यक असतात, असेही गुरुमाउली म्हणाले.

दुपारी चारला पालखी सोहळा व प्रसादाचे वाटप झाले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

===========

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.