Gurumauli Annasaheb More : सत्यस्वरूपाची ओळख सद्गुरूच करून देतात! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : मनुष्य जन्माला येणे, सद्‌गुरूंची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास मिळणे, या तीन्ही गोष्टी फार दुर्लभ आहेत. म्हणूनच सद्गुरू कृपेसारखा लाभ नाही, असे म्हणतात.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

त्र्यंबकेश्‍वर : मनुष्य जन्माला येणे, सद्‌गुरूंची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास मिळणे, या तीन्ही गोष्टी फार दुर्लभ आहेत. म्हणूनच सद्गुरू कृपेसारखा लाभ नाही, असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा काही मागायची इच्छाच सद्गुरू नष्ट करतात. सद्गुरू बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते. (Gurumauli Annasaheb More statements Sadguru who identifies true form)

कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते, असे दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. २५) सांगितले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, की एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही.

आत वावरणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या, परब्रह्माच्या, ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामध्ये जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषांपेक्षा, सद्‌गुरूपेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे, कायम टिकणारे देवाला स्मरून आणि देहाला विसरून जे मिळवायचे, ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे.

आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमधून प्रवास करो, अगदी बिनतिकिटाची माणसेदेखील गाडीबरोबरच शेवटच्या स्थानकापर्यंत जाऊन पोचतात. त्याचप्रमाणे गुरुकृपा झालेली सर्व माणसे परबह्मापर्यंत पोचतात. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Nashik Teachers Constituency : शिक्षक लोकशाही आघाडीत नाशिक विभागात फूट

त्यांच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्यात आणि अयोग्य अशी माणसेसुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सद्‌गुरूंचा, सत्संगतीचा महिमा. सद्‌गुरूंनी सांगितलेल्या मंत्राची संगत धरावी, त्याच्या विचाराची संगत धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो, ते कारण फक्त सद्गुरूच सांगतात म्हणून त्यांना शरण जावे, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप झाले. चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.