Gurumauli Annasaheb More : आत्मकल्याणासाठी प्रत्येक क्षण खर्ची घाला : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Nashik News : गुरुमाउली म्हणाले, की आयुष्याच्या सरत्या काळात आपण काय गमावले, काय कमावले याचा हिशेब बिनचूक, लख्खपणे समोर असतो.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
Updated on

त्र्यंबकेश्‍वर : संस्कृतमध्ये एक बहुप्रचलित सुभाषित आहे...

‘‘यावत् स्वस्थं इदं शरीर मरुजं यावत् जरा दूरतो।

यावत् च इन्द्रियशक्तितर अप्रतिहता यावत् क्षयो न आयुष:।

आत्मश्रेयसि तावद् एव विदुषा कार्य: प्रयत्नो महान्।

संदीप्ते भवने तु कूपखननं प्रति उद्यम: कीदृश:॥’’

या श्लोकाच्या अर्थानुसार जोपर्यंत माणसाचे शरीर निरोगी आहे, तोपर्यंतच शहाण्या माणसाने खूप मेहनत करून जीवन सार्थकी लावावे. जोपर्यंत इंद्रियांची शक्ती क्षीण होत नाही, जोपर्यंत म्हातारपण येत नाही, जोपर्यंत आयुष्य मिळाले आहे, तोपर्यंत आत्मकल्याणासाठी प्रत्येक क्षण खर्ची घालावा, जसे घराला आग लागल्यावर विहीर खणणे मूर्खपणाचे आहे तसेच आयुष्याच्या सायंकाळी आत्मकल्याणासाठी सुरवात करणे म्हणजे निरर्थक वेळ घालवणे आहे.

असे दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. १३) येथे सांगितले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. त्या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गुरुमाउली म्हणाले, की आयुष्याच्या सरत्या काळात आपण काय गमावले, काय कमावले याचा हिशेब बिनचूक, लख्खपणे समोर असतो.

म्हणूनच जुनी, जाणती पिढी नव्या पिढीला चूक-बरोबर समजावून देण्यासाठी पदोपदी सूचना देत असते, उपदेश करीत असते. हा संवाद प्रभावी, परिणामकारक व हसत-खेळत होणे आवश्यक आहे. खरंतर लहानपणापासूनच कसे जगावे, का व कशासाठी जगावे, याचा बोध व्हायला हवा. या बोधासाठी संस्कार-शिक्षण, पुस्तकी शिक्षण अट्टहासाने राबवले जात आहे. तरी ही जगण्याची सुंदर मांडणी करणारे शिक्षण मिळत नाही. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

पिढ्यान् पिढ्या याच जाणिवेतून कालक्रमणा करीत असतात. कुठेतरी हे थांबले पाहिजे. जगण्याचा विचार व नियोजन, मार्ग व व्यवस्थापन लहानपणीच मुलांच्या अंत:करणात योग्य पद्धतीने रुजले पाहिजे तरच उपलब्ध परिस्थितीत संधींमध्ये त्यांना आपल्या क्षमतांचा मेळ घालता येईल. जगण्याचा सुंदर आदर्श नव्या पिढीला जसा मार्गदर्शनाने सांगता येतो तसाच किंवा त्याहून महत्त्वाचा म्हणजे चालते-बोलते आदर्श पाहून कळतो, त्यांच्या अनुकरणाने सहज साध्य होतो.

उक्तीपेक्षा कृती जास्त महत्त्वाची असते. जाणत्या पिढीचे वागणे जबाबदारीचे, नीतिमूल्यांचे, विशाल मनाचे, समानता व न्यायाचे, प्रामाणिकपणाचे, श्रद्धा-भक्तीचे असेल, तर त्याचा प्रभाव नकळत वाढत्या पिढीवर योग्य प्रकारे पडतो व त्यातून संस्कृतीही बहरात मूर्त रूपाने साकार होते. हे सर्व सद्गुण, अंत:करणात, व्यक्तिमत्त्वात विशेषतः अध्यात्माने अंत:करणात दृढ होतात व धर्मानुसार आचारणात उतरतात.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : ज्ञानाचे पवित्र महाउज्ज्वल लावण्य म्हणजे समस्त दृष्टी : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

म्हणूनच मानवतेचा पुरस्कार करणारा, निरपेक्ष प्रेम, नैतिकता, एकता वाढवणारा धर्म, माणसाचे माणूसपण फुलवणारे अध्यात्म हे सार्वकालिक, शाश्वत आहे. सर्व धर्मांनी हीच शिकवण दिली आहे. ‘खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।’ म्हणणाऱ्या साने गुरुजींची, संतांची हीच तळमळ होती. हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची, आचरणातून पटवून द्यायची समाजाची सर्वांत मोठी गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:वर सुसंस्कार करून घेऊन ‘माणूस’ असणे, हे अन्न, वस्त्र, हवा, जल यासारखेच महत्त्वाचे आहे, असेही गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन झाले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : सद्‌गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त तेजस्वी, ज्ञानी बनवतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.