Nashik News : गंगापूर धरणातून सातपूर जलशुद्धीकरण केंद्राला जोडणारी ५०० मिलिमीटर व्यासाची सिमेंट पाइपलाइन धृवनगर भागात फुटल्याने सोमवारी (ता. १७) सकाळपासून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरी मंगळवारी (ता. १८) देखील शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. (Half of city water supply disruption Pipeline burst in Dharmanagar area)
शहराला मुख्यत्वे गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून कच्चे पाणी उचलले जाते. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी स्वच्छ करून घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सिमेंट पाइपलाइन टाकण्यात आली आहे. सदर जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने नाशिक महापालिकेने अमृत दोन योजनेअंतर्गत लोखंडी पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे.
त्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला. मात्र अद्यापपर्यंत प्रस्ताव कागदावरच आहे. दरम्यान, सिमेंट पाइपलाइन बदलण्याचा प्रस्ताव असतानाच सोमवारी सकाळी ५०० मिलिमीटर व्यासाची सिमेंट पाइपलाइन मोतीवाला कॉलेज येथे फुटली. सकाळच्या सत्रात पाइपलाइन फुटल्याने ध्रुवनगर, बळवंतनगर, गणेशनगर, रामराज्य नहुश जलकुंभ भरले गेले नाही.
त्याचप्रमाणे त्या पुढचादेखील पाणीपुरवठा झाला नाही. पाइपलाइन दुरुस्तीचे काम सोमवारी सकाळी नऊ वाजता हाती घेण्यात आले रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. त्यामुळे १८ जूनलादेखील बहुतांश भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. (latest marathi news)
या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
- प्रभाग ७ (भागश:)- नहुष जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर : नहुष सोसायटी परिसर, पुर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेवनगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचितनगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांतिनिकेतन इत्यादी परिसरात
- प्रभाग ८- बळवंतनगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर : बळवंतनगर, रामेश्वरनगर, सिरीन मिडोज, सोमेश्वर कॉलनी, आनंदनगर, खांदवेनगर, सदगुरुनगर, पाटील लॉन्स परिसर, आनंदवल्ली, आनंदवल्ली गाव व परिसर, सावरकरनगर, शंकरनगर, शारदानगर, पाम स्प्रिंग, कल्याणीनगर, चित्रांगण सोसायटी, मते नर्सरी रोड, नरसिंहनगर, पंचम सोसायटी, रामनगर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, भगूरकर मळा इ. परिसर. गणेशनगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर: गणेशनर, कामगारनगर, गुलमोहर कॉलनी, काळे नगर, सुयोग कॉलनी, पाइपलाइन रोड परिसर, गुरुजी हॉस्पिटल मागील परिसर विवेकानंद नगर, निर्मला विहार
- प्रभाग क्र.९(भागश:)- ध्रुव नगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर: मोतीवाला कॉलेज परिसर, गुलमोहर कॉलनी परिसर, शिवशक्ती कॉलनी, तुकाराम क्रीडांगण परिसर व नवीन ध्रुवनगर परिसर इत्यादी
- प्रभाग क्र. १२ (भागश:) रामराज्य जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर: कल्पनानगर, मॉडेल कॉलनी, कृषीनगर परिसर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल, गंगापूर रोड स्वामी समर्थ मंदिर परिसर, डिसूझा कॉलनी, गंगापूर रोड परिसर,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.