Nashik News : नामपूर बाजार समितीत हमालांचे आमरण उपोषण

Nashik News : परवाना नूतनीकरण करण्यास बाजार समिती प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा निषेधार्थ नामपूर बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर सर्व ५७ हमाल बेमुदत उपोषणास बसले आहेत.
Hamal protesting for license renewal in front of the entrance of the market committee in Navapur
Hamal protesting for license renewal in front of the entrance of the market committee in Navapuresakal
Updated on

Nashik News : नामपूर येथील बाजार समितीच्या करंजाड उपबाजार आवारात कार्यरत असणाऱ्या ५७ नोंदणीकृत माथाडी हमालांचा परवाना नूतनीकरण करण्यास बाजार समिती प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा निषेधार्थ बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर सर्व ५७ हमाल बेमुदत उपोषणास बसले आहेत. (Hamal hunger strike in Nampur Bazar Committee)

याबाबत शुक्रवारी (ता. ७) सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची तातडीची मीटिंग होणार असून परवाना नूतनीकरणबाबत काय निर्णय लागतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील बाजार समितीच्या करंजाड उपबाजार आवारात ५७ माथाडी कामगार हमाल म्हणून कार्यरत आहेत. गेली दोन वर्षे त्यांच्या परवाना नूतनीकरणही झाले आहे.

परंतु गतवर्षी झालेल्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत नवीन संचालक मंडळ निवडून आले असून यंदा सदर हमालांच्या परवाना नूतनीकरण करण्यास गेल्या तीन महिन्यापासून टाळाटाळ केली जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणं आहे. करंजाड उपबाजार आवारातील हमालांचे परवाना नूतनीकरण करावे, असे आदेश जिल्हा निबंधक फैयाज मुलानी.

सरकारी कामगार अधिकारी श्री. वझरे यांनी दिलेले असतानाही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे आंदोलकांनी सकाळशी बोलताना सांगितले. लेव्हीच्या मुद्द्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हाताला काम नसल्याने कुटुंबाची गुजराण कशी करायची, असा प्रश्न हमालांना पडला आहे. (latest marathi news)

Hamal protesting for license renewal in front of the entrance of the market committee in Navapur
Nashik News : सुरक्षिततेसाठी भविष्यात ‘माध्यम’ शिक्षण गरजेचे; वादविवादात अनेकांची भाषा घसरत असल्याने जाणकारांचे मत

आंदोलन काळात बाजार समितीचे संचालक विलास सावंत, के. पी. कापडणीस, पंकज भामरे, किरण वाघ, आकाश भामरे, सचिव संतोष गायकवाड, शिवसेनेचे संभाजी सावंत, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब कापडणीस आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या भावना समजून घेतल्या.

मालेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनीही आंदोलकांची समजूत काढली, परंतु जोपर्यंत परवाना नूतनीकरण होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषणार ठाम असल्याचे चेतन भामरे, जीभाऊ भदाणे, सचिन भामरे, समाधान मांडवडे, धनंजय भामरे, दादाजी भदाणे आदींसह आंदोलकांनी यावेळी सांगितले.

Hamal protesting for license renewal in front of the entrance of the market committee in Navapur
Nashik Traffic Rules Break : चालकांनो थांबा, मगच बोला...! वाहन चालविताना मोबाईल असतो कानाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.