Nashik: आदिवासींच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘स्वदेस’चा हात! बारावीनंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; गरिब हुशार विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण

Latest Nashik News : जिल्ह्यामधील इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यातुन सुरू आहेत.
swades foundation
swades foundationesakal
Updated on

पेठ : आदिवासी भागातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्वदेस फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्तीची योजना सुरु केली असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी तालुका प्रमुखांशी संपर्क साधावा असे आवाहन स्वदेस फाउंडेशच्या प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरिना स्क्रूवाला यांनी केले. यामुळे गरिब विद्यार्थ्यांची शिक्षणाची मोठी सोय होत आहे. (Nashik hand of Swades to fulfill dreams of tribals)

जिल्ह्यामधील इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यातुन सुरू आहेत. स्वदेस शिष्यवृत्ती योजना हा या उपक्रमाचाच एक भाग आहे. गेल्या वर्षांत ४२ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता

विद्यार्थी हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या तालुक्यातील रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८.५ लाखांच्या आत असावे. १२ वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. विद्यार्थ्याची उच्च शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा असावी.

स्वदेस फाउंडेशनने दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून माहिती भरून २५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी पाठवावी. त्यानंतर फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्याच्या दोन मुलाखती घेतल्या जातील. मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल. (latest marathi news)

swades foundation
Nashik News : फुले दांपत्याच्या शिल्पांसाठी दीड वर्ष अविरत कष्ट! कुडाळचे शिल्पकार पांचाळ यांनी साकारले शिल्प

शिष्यवृत्तीचे स्वरूप

शिष्यवृत्ती विद्यार्थ्याचे उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाईल. प्रत्येक वर्षी दोन हप्त्यांमध्ये ही शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ही रक्कम विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पनानुसार दिली जाईल, ज्यात विद्यार्थ्याच्या कॉलेज शुल्क आणि वसतिगृह खर्चाचा समावेश केला जाईल.

या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती

वैद्यकीय : बीएएमएस, एमबीबीएस, बीडीएस, नर्सिंग, फार्मसी., वाणिज्य : सीए, सीएस, बीकॉम इन अकाउंटन्सी., अभियांत्रिकी : पदवी, पदविका व आर्किटेक्चर., कायदा क्षेत्र : एलएलबी. हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर उच्च शिक्षण घेण्यासाठी पात्रता परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी, सैन्यदल व पोलिस पात्रता परीक्षा यासाठीही शिष्यवृत्ती देण्यात येते.

माहितीसाठी संपर्क

अधिक माहितीसाठी तालुका प्रतिनिधींशी संपर्क करावा, असे आवाहन स्वदेश फाऊंडेशनचे शिक्षण विभागप्रमुख रजनीश कट्टाडी यांनी केले आहे. इगतपुरी ः गंगाधर जाधव (८२७५३८९६२१), त्र्यंबकेश्वर- नीलेश यादव (९३०९२९४९७४), पेठ ः सुनील बोऱ्हाडे (७०४०४७१९४७), सुरगाणा ः तुषार आंब्रे (९९२३९७४५९२).

swades foundation
Yeola MSRTC Depot: जुन्या बसमुळे लागली दृष्ट! 5 बस स्क्रॅपच्या वाटेवर, सर्व बसचे आयुर्मान झाले 10 वर्षांचे; नव्या बसची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.