Nashik News : बॅंकांना कर अडचणीबाबत आयकर विभाग मदत करणार : हर्षद आराधी
Nashik News : सरकारकडून सर्व प्रकारच्या पायाभूत सोयी-सुविधा मिळविण्यासाठी प्रत्येकाने कर वेळेत भरलाच पाहिजे. अग्रीम कर हा वर्षातून चार वेळा म्हणजेच १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर, १५ मार्च पूर्वीचा भरावा. कुठल्याही नागरी सहकारी बँकेला करासंदर्भात काही अडचण असल्यास थेट आयकर विभागाच्या कार्यालयात येऊन भेटावे. (Nashik Harshad Aradhi statement of Income Tax Department marathi news)
अडचणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, असे प्रतिपादन आयकर विभाग नाशिक रेंज-एकचे अतिरिक्त आयुक्त हर्षद आराधी यांनी केले. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे ‘अॅडव्हान्स टॅक्स अॅप्लिकेबल टू को-ऑपरेटिव्ह बँक्स्’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गंगापूर रोडवरील डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग येथे केले होते. (latest marathi news)
त्याप्रसंगी ते बोलत होते. आयकर विभाग सर्कल-१ चे उपायुक्त संदीप जुमले यांनी टीडीएसबाबत मार्गदर्शन केले. बँकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी आयकर विभागातील आय.टी. ऑफिसर संजय सिंग, महिपाल सिंग, नितीन गरूड उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, अॅडव्हान्स टॅक्स व टीडीएसबाबत बँकांच्या अडीअडचणी सांगितल्या.
तसेच इन्कम टॅक्स ऑफिसकडून नागरी सहकारी बँकांना टीडीएस व अॅडव्हान्स टॅक्सबद्दलचे सॉफ्टवेअर मिळण्यास बँकांकडून अचूक माहिती इन्कम टॅक्स ऑफिसकडून सभासद बँकांसाठी अजून एका दिवसाच्या सखोल कार्यशाळेचे आयोजन केल्यास सर्व अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील २९ सहकारी सभासद बँकांचे ७० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक असोसिएशनचे व्यवस्थापक रामलाल सानप यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.