Nashik News : कचराडेपोची डोकेदुखी वाढतेय! लासलगावकरांचा आक्रोश कोण ऐकणार? विद्यार्थ्यांसह नागरिक अन नदीचेही आरोग्य धोक्यात

Latest Nashik News : नागरी वसाहतीही जवळ असल्याने नागरिकांनी अनेकदा याबाबत आवाज उठविला, मात्र संबंधित प्रशासनाने त्यावर काहीही निर्णय न घेतल्याने याप्रश्‍नी मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
Dumping ground on the banks of Sivandi at Lasalgaon.
Dumping ground on the banks of Sivandi at Lasalgaon.esakal
Updated on

लासलगाव : लासलगावच्या शिवनदीच्या काठावर लासलगाव महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कचरा डेपोमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरी वसाहतीही जवळ असल्याने नागरिकांनी अनेकदा याबाबत आवाज उठविला, मात्र संबंधित प्रशासनाने त्यावर काहीही निर्णय न घेतल्याने याप्रश्‍नी मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. (headache of garbage depot increasing in lasalgaon)

लासलगाव शहर व काठावरची अन्य गावे यांचा जमा झालेला सर्व घनकचरा हा ग्रामपंचायतीमार्फत घंटागाडीद्वारे जमा करण्यात येतो. तो अनेक वर्षापासून असलेल्या शिवनदीच्या काठावरील डम्पिंग ग्राउंडवर एकत्रित केला जातो. या घनकचऱ्यातील बराच कचरा नदीच्या पाण्यात पडत असल्याने तो दूषित होतो.

यामुळे नदीचे प्रदूषण वाढते, घनकचरा कुजून त्याची दुर्गंधी निर्माण होते, त्याचा परिणाम विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यवर होतो. बऱ्याचदा अज्ञाताकडून या कचरा डेपोला आग लावली जाते, त्यामुळे सतत वातावरणात धूर पसरून मोठ्या प्रमाणात विषारी वायू वातावरणात मिसळतात, यामुळे वायूचे प्रदूषण होते. याच डम्पिंग ग्राउंडसमोर असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. (latest marathi news)

Dumping ground on the banks of Sivandi at Lasalgaon.
Nashik News : पिंपळगावला नगरपरिषदेसाठी जि. प. अनुकूल; स्थायी समितीने शासनाकडे केली नगरपरिषदेची शिफारस, 2 दिवसात घोषणा शक्य

नागरिकांचा लढा सुरूच

लासलगावची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता वाढणाऱ्या नागरी वसाहतीमुळे बाजूला असलेल्या रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. एकेकाळची लासलगावची सर्वात जुनी शास्त्रीनगर वसाहत याच परिसरात असल्याने येथेही नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.

नागरिकांनी याबाबत अनेकदा आवाज उठविला आहे. परिसरातील नागरिकांनी, कॉलेज प्रशासनाने वेळोवेळी संबंधित पर्यावरण विभागाशी पत्रव्यवहार व तोंडी सूचना करूनही प्रशासनामार्फत कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

"कचरा डेपोसंदर्भात वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार तसेच तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा परिसरातील नागरिक मोठे जनआंदोलन करतील, त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील."- दिनेश जोशी, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव

"शिवनदी संवर्धन निधीअंतर्गत डम्पिंग ग्राउंडला संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. परिसराचे काही प्रमाणात सुशोभीकरण होणार आहे, तेथे वृक्षारोपण केले जाणार आहे. नागरिकांनी कचऱ्याचे ओला कचरा व कोरडा कचरा याचे विलगीकरण केल्यास समस्या काही प्रमाणात कमी होईल. योग्य जागा उपलब्ध झाल्यास डम्पिंग ग्राउंड तिथून हलवले जाईल."

- लिंगराज जंगम, ग्रामसेवक, ग्रामपंचायत लासलगाव

Dumping ground on the banks of Sivandi at Lasalgaon.
Rahul Gandhi Reaction: "हरियानाच्या अनपेक्षित निकालाचे..."; निवडणूक निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.