Nashik News : राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राचे मुख्यालय नाशिकलाच हवे! खासदारांचे मत

Nashik News : ‘नाफेड’चा अध्यक्ष हाच बागवानी संशोधन केंद्राचा पदसिद्ध अध्यक्ष असताना त्याला वेगळे वळण देत बिजेंद्रसिंग यांनी त्यावर एकहाती हुकूमत दाखवली आहे.
MP Bhaskar Bhagare, MP Dr. Shobha Bachhav, MP Rajabhau Waje
MP Bhaskar Bhagare, MP Dr. Shobha Bachhav, MP Rajabhau Wajeesakal
Updated on

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘नाफेड’ अंतर्गत राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र या कांदा संशोधनाबाबत महत्त्वाच्या मुद्द्यावर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकल्यावर जिल्ह्यातील खासदारांनी याबाबत सकारात्मकता दाखवत मुख्यालय पुन्हा चितेगाव येथे आणून शेतकऱ्यांना एक सुसज्ज यंत्रणा उभारून त्यांच्या उत्पादकतेत वाढ करून देणार असल्याची ग्वाही दिली. (headquarters of National Horticulture Research Center should be in Nashik)

काही वर्षांपूर्वी ‘नाफेड’चा अध्यक्ष हाच बागवानी संशोधन केंद्राचा पदसिद्ध अध्यक्ष असताना त्याला वेगळे वळण देत बिजेंद्रसिंग यांनी त्यावर एकहाती हुकूमत दाखवली आहे. त्यांच्या याच कारभारामुळे ‘ओनियन कॅपिटल’मधील नवनवे उपक्रम बंद पडून ती इमारत ओसाड पडल्याचे चित्र आहे.

"‘सकाळ’ने ‘एनएचआरडीएफ’च्या महत्त्वाच्या विषयाला स्पर्श केला आहे. शेतीपट्टा असलेल्या माझ्या मतदारसंघात कांदा हाच महत्त्वाचा विषय आहे. देश-परदेशात निर्यात होणाऱ्या लासलगाव, पिंपळगावसारख्या बाजारपेठा येथेच आहेत. बागवानी अनुसंधान केंद्राचे मुख्यालय हे नाशिकच हवे, ही आता माझी आग्रही मागणी आहे. मी शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलून याबाबत वस्तुस्थिती मांडली. हा त्यांच्याही जिव्हाळ्याचा प्रश्न असून, याबाबत पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्र्यांबरोबर महत्त्वाची बैठक घेऊन हा विषय चर्चेत आणला जाईल. पुन्हा नाशिक मुख्यालयासाठी मी स्वतः पूर्ण प्रयत्न करेन." - भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ (latest marathi news)

MP Bhaskar Bhagare, MP Dr. Shobha Bachhav, MP Rajabhau Waje
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

"माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघात ‘कसमादे’सह खानदेश भाग हा कांदा उत्पादकांचे मुख्य उत्पन्न स्रोत आहे. कांद्यातील बियाणे प्रमाणित करून सहा प्रकार नाशिक केंद्राकडून शेतकऱ्यांना वितरित केले जातात. या संस्थेचा कणा ‘नाफेड’ आहेच, शिवाय केंद्र सरकारने या विषयाकडे लक्ष देऊन हे संशोधन केंद्र शेतकरी हितासाठी पुन्हा कशी उभारी घेऊन काम करेल, याबाबत निर्णय घ्यावा. नाशिकच याचे मुख्यालय हवे, यात कोणतीही शंका नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मी सदैव तत्परतेने काम करणार आहे." - डॉ. शोभा बच्छाव, खासदार, धुळे लोकसभा मतदारसंघ

"चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राचा फायदा मागील काळात अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झाला. त्यांनी एकेकाळी राबविलेले उपक्रम आणि केलेले अभ्यास दौरे खरोखर कौतुकास पात्र ठरले होते. त्या ज्ञानाचा फायदाही कांदा उत्पादकांना झाला. सात वर्षांपूर्वी त्याचे मुख्यालय दिल्लीत हलविले गेले; परंतु कांद्याचे माहेरघर हे नाशिक असताना हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा राहू शकत नाही. शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून मी स्वतः लक्ष घालून संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून हा विषय मार्गी लावेन." - राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक लोकसभा मतदारसंघ

MP Bhaskar Bhagare, MP Dr. Shobha Bachhav, MP Rajabhau Waje
Nashik Monsoon Season : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम; 24 तासांत पुन्हा 93 मिलिमीटरची विक्रमी बरसात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.