Nashik Water Shortage : टॅंकरने पुरविलेल्या पाण्याची तपासणी; जि. प. देणार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Water Shortage : जिल्ह्यात टंचाईचे संकट गडद होत असून, दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढत आहे.
water tanker
water tankeresakal
Updated on

Nashik Water Shortage : जिल्ह्यात टंचाईचे संकट गडद होत असून, दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढत आहे. टॅंकरचा पाणीपुरवठा शुद्ध असावा, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. ज्या ठिकाणी टॅंकर भरला जातो त्या पाणीस्रोतांची, तसेच गावात टॅंकर दाखल झाल्यानंतर टॅंकरच्या पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. याकरिता आरोग्य विभाग संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. (nashik health department has decided to check water of tanker in village marathi news)

जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा वाढत आहे. टँकरने पाणीपुरवठा करताना जनतेला शुद्ध पाणीपुरवठा होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने टॅंकरच्या पाणीस्रोतांची तपासणी आरोग्य विभाग करणार आहे. याकरिता विभागाने पाणीपुरवठा करणारा संबंधित कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, जल सुरक्षारक्षक यांना प्रशिक्षण देणार आहेत.

फिल्डवर ज्या गावात टँकर शुद्धीकरण करताना प्रामुख्याने ज्या स्रोतांचे पाणी पिण्यासाठी वापरणार आहेत त्या विहिरीचे ३३ टक्के क्लोरिनयुक्त ब्लिचिंग पावडरने शुद्धीकरण केला जाणार आहे. ब्लिचिंग पावडरने पाणी शुद्धीकरण केल्यानंतर पाण्यातील जिवाणू व विषाणू मृत पावण्यासाठी कमीत कमी अर्ध्या तासाचा कालावधी लागतो.

याकरिता शुद्धीकरण केल्यानंतर पाणी कमीत कमी अर्धा तास एकाच ठिकाणी साठवणूक करून ठेवणे. तद्नंतर क्लोरिनची मात्रा क्लोरोस्कोपच्या सहाय्याने तपासून क्लोरिनची मात्रा योग्य प्रमाणात आहे का, याची नियमित तपासणी करून तशा नोंदी नोंदवहीत ठेवल्या जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी दिली. (latest marathi news)

water tanker
Nashik Water Shortage : जिल्ह्यातील धरणांत 23 टक्केच जलसाठा; मृग, रोहिणी गेले कोरडे

आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना

- ज्या स्रोतावरून टँकर पाणी भरत असेल तिथे जागेवरच ओटी टेस्ट घेणे, नजीकच्या ठिकाणी हवाबंद खोलीत घट्ट झाकण असलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात ब्लिचिंग पावडरचा साठा करून ठेवणे.

- स्रोतांचे पाणी वापरण्यापूर्वी त्याची जैविक व रासायनिक तपासणी करावी, तसेच ब्लिचिंग पावडरचा नमुना जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतून तपासणी करून त्याचा अहवाल नियमित प्राप्त करून घ्यावा.

- स्रोतांचे पाणी हे प्रशिक्षित जलसुरक्षक किंवा आरोग्यसेवक यांनी तपासावे. दैनंदिन अहवालात त्यांच्या स्वाक्षरीसह नोंद करावी.

water tanker
Nashik Water Shortage: इंदिरानगरमध्ये कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक हैराण

- पाणी तपासणी करताना वाहनाचा नंबर व वाहनचालकाचा नंबर याबाबत माहिती अद्ययावत करून ठेवावी.

- प्रतिबंधित केलेल्या स्रोतांवर पिण्याचे पाणी भरू नये, असे स्रोत असल्यास त्यासमोर प्रतिबंधित असल्याचा फलक लावावा. कार्यक्षेत्रात दवंडी देऊन याबाबत जनजागृती करावी.

- गावांतील सर्व स्रोतांच्या आजूबाजूच्या परिसरांत स्वच्छता करून सर्व स्रोतांचे (हातपंप/विहीर/ पाण्याची टाकी) तत्काळ शुद्धीकरण करावे.

-ज्या वाडी-वस्तींवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नसेल अशा ठिकाणी नागरिकांना मेडिक्लोर द्रावणच्या बॉटलचे घरोघरी वाटप करण्याबाबत नियोजन करावे.

water tanker
Nashik Water Shortage : देवळा तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा; 29 वाड्यावस्तीवर टँकरने पाणी पुरवठा सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.