Nashik News : राज्यासह जिल्ह्यातील बालमृत्यूंचे प्रमाण शून्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात ६ ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येईल. प्रामुख्याने अतिसारामुळे बालमृत्यू होत असल्याने या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. (Nashik Health Department)
या कार्यक्रमाच्या व्यवस्थापन, अंमलबजवणीबाबत जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अर्भक मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. साधारणतः पाच ते सात टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूंचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
गुरुवार (ता. ६)पासून २१ जूनपर्यंत या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातील. त्याबाबत बैठकीत नियोजन करण्यात आले. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस आणि झिंकचा वापर व उपलब्धता वाढविणे, अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे आणि शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग. (latest marathi news)
भटक्या जमाती, वीटभट्टी कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले, जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे, गत दोन वर्षांत अतिसारातील साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र, यावर विशेष लक्ष देणे, हे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे धोरण आहे. त्यासाठी अतिजोखमीच्या क्षेत्राचा नियोजनाद्वारे सूक्ष्म कृती आराखडा तयार केल्याचे सांगण्यात आले.
सर्व शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येऊन हात धुण्याच्या टप्प्यांविषयी पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. सदर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत गोळ्यांचे वितरण करावे, सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला व बालविकास विभाग.
शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने काम करीत जिल्ह्यातील बालकांना झिंक आणि ओआरएस गोळ्यांचे वितरण करीत अतिसार नियंत्रण कार्यक्रमात सहभाग घेण्याच्या सूचना मित्तल यांनी दिल्या. डॉ. नेहेते यांनी मोहिमेबाबत माहिती दिली.
ही आहेत अतिसाराची लक्षणे
सौम्य किंवा गंभीर जलसृष्टीची लक्षणे, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटाघटा पाणी पिणे, त्वचेला चिमटा घेतला असता त्वचा हळूहळू पुरवत होणे, स्तनपान न करू शकणे, एका दिवसात तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होणे आदींसारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा
बालकांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांनी या वेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.