Salt Side Effects: मिठाचे सेवन कमी करा अन गंभीर आजार टाळा! उच्च रक्तदाब, हृदयविकार, पॅरालिसिस, मूत्रपिंड, किडनी स्टोनचा धोका

Health News : मिठाशिवाय अन्न आपण कल्पनाच करू शकत नाही. मात्र ते कमी प्रमाणात असेल तर योग्य. कुठल्याही पदार्थाचे अधिक स्वरूपात सेवन केल्यास आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम जाणवतात.
Salt Side Effects
Salt Side Effectsesakal
Updated on

Salt Side Effects : अलीकडे शरीरामध्ये अतिरिक्त पाणी साचून राहणे याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचे लक्षणे दिसत आहे. शरीरात अतिरिक्त पाणी साचणे याचे मुख्य कारण मिठाचे अतिरिक्त सेवन होय. मीठ हे पाण्याला धरून ठेवते पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे पाणी साचल्यामुळे अनेक अवयवांवर ताण निर्माण होऊन त्याचे रूपांतर गंभीर आजारांमध्ये होते, म्हणून मिठाचे कमी सेवन करावे. (Nashik health Reduce salt intake avoid serious diseases)

मिठाशिवाय अन्न आपण कल्पनाच करू शकत नाही. मात्र ते कमी प्रमाणात असेल तर योग्य. कुठल्याही पदार्थाचे अधिक स्वरूपात सेवन केल्यास आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम जाणवतात. यामुळे आरोग्याची समस्या उद्भवून त्याचे पर्यवसान गंभीर आजारांमध्ये होऊ शकते.

यामध्ये प्रामुख्याने किडनी व हृदयविकार पॅरालिसिस मूत्रपिंड, रक्तदाब, पोट व किडनीच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. मीठ हा एक असा पदार्थ आहे. जो दररोज वेगवेगळ्या पदार्थांतून आपण खातो. पण, अधिक प्रमाण शरीरासाठी घातक आहे.या मुळे शरीरातील अनेक अवयवांना त्याची बाधा होते. (Latest Marathi News)

Salt Side Effects
आरोग्यासाठी आहारातून मीठ कमी करायचंय? या पद्धतीने Salt खाणं करा कमी

उच्च रक्तदाब, हृदयविकार, पॅरालिसिस, मूत्रपिंडाचा आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो. मात्र दैनंदिन जीवनात मिठाशिवाय जेवण बेचव लागत असल्याने ते खाऊ शकत नाही. गरजेपेक्षा जास्त मीठ खाणे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकते. परिणामी, जास्त तहान लागणे, सूज येणे, रक्तदाब वाढणे आणि हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडावर ताण येतो. त्यामुळे हृदयविकार व मेंदूमध्ये रक्तस्त्राव ही होऊ शकतो.

"मिठामुळे शरीरात साचलेलं अतिरिक्त पाणी लघवीद्वारे औषधोपचाराने काढता येऊ शकते. मात्र त्यासाठी पथ्य आवश्यक.पोटात पाणी जमा झाल्यामुळे हात व पायांना सूज येते.रक्ताच्या उलट्याही होऊ शकतात योग्य वेळी उपचार घेतल्यास एन्डोस्कोपी व गॅस्ट्रोस्कोपी द्वारे उपचार शक्य आहे.मात्र यासाठी मीठ टाळावे मिठाचे कमी प्रमाणात सेवन करावे."

- डॉ. शरद देशमुख, लिव्हर व पोट विकार तज्ञ, मेडीलिव्ह हॉस्पिटल

Salt Side Effects
Salt Making : घरी खाण्यासाठी व्यक्ती स्वत:च बनवतोय मीठ; पाहा समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवण्याची प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com