Nashik Heavy Rain: ‘परती’च्या पावसाचा जोरदार दणका! पिंपळगाव परिसरात ढगफुटीसदृश धुवाधार पावसाने झोडपले; खरीप पिकांचे मोठे नुकसान

Latest Nashik Heavy Rain News : पिंपळगाव बसवंत परिसरात तासाभरात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस झाला. या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षबागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण वाढणार आहे.
Rain water collected in Pimpalgaon Baswant vineyards & water collected in harvested maize of old Shemli farmer Nandlal Suryavanshi.
Rain water collected in Pimpalgaon Baswant vineyards & water collected in harvested maize of old Shemli farmer Nandlal Suryavanshi.esakal
Updated on

Nashik Heavy Rain : परतीच्या पावसाने जिल्ह्याला शनिवारी रात्री आणि रविवारी (ता. १३) सायंकाळी जोरदार दणका दिला. विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश झालेल्या या पावसाने बागलाण, कळवणचा पश्‍चिम पट्टा आणि निफाड तालुक्यात द्राक्ष, कांदा, सोयाबीन, मक्यासह भाजीपाल्याच्या पिकांची अपरिमित हानी झाली आहे.

पिंपळगाव बसवंत परिसरात तासाभरात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस झाला. या पावसाने छाटणी झालेल्या द्राक्षबागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण वाढणार आहे. चांदवड तालुक्यात पश्‍चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने विनता नदीला मोठा पूर आला आहे. एकूणच या पावसाने जिल्हाभर ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. (heavy bang of particha paus Pimpalgaon area)

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत व परिसरात रविवारी सायंकाळी तासभर कोसळलेल्या धुवाधार पावसाने परिसराला झोडपले. छाटणी झालेल्या द्राक्षबागांना पावसाने तडाखा दिला. तासभर झालेल्या पावसाने द्राक्षबागांमध्ये पाणी तुंबले. त्याचा परिणाम मुळ्यांवर होणार आहे.

यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पाण्यात गेले आहे. पिंपळगाव बसवंतसह साकोरे मिग, कोकणगाव, पालखेड, शिरवाडे वणी परिसरात पावसामुळे दाणादाण उडाली आहे. ढगफुटी व्हावी असा पाऊस विजांच्या कडकडाटासह कोसळला. निफाड तालुक्यातील सुमारे २५ हजार एकरांवर द्राक्षबागांची फळधारणा छाटणी झाली आहे.

त्यांना आजच्या पावसाने मोठा तडाखा बसला. छाटणीनंतर निघालेले घड जिरण्याचे प्रमाण वाढणार असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. दरम्यान, पावसामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. वणी चौफुलीपासून ते उंबरखेड चौफुलीपर्यंत तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली.

द्राक्षांची पाने फाटली

कसबे सुकेणे : कसबे सुकेणे व परिसरात सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ असा दोन तास जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मक्यासह द्राक्षांचे नुकसान होणार आहे. सोयाबीनची कापणी झालेली असताना अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन भिजला आहे.

पावसामुळे पुन्हा छाटणीला व्यत्यय येणार आहे. द्राक्षबागांची पाने फाटली असून, मोगऱ्यात असलेल्या द्राक्षबागेच्या कोंबामध्ये पाणी साचल्याने डाउनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. माघारी मॉन्सून द्राक्ष शेतकऱ्यांच्या मुळाशी उठण्याची शक्यता आहे.

कोकणगाव : कोकणगाव परिसरात रविवारी (ता. १३) सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सुमारे एक ते दीड तास सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. या पावसाने सोयाबीन काढणीच्या कामात व्यत्यय आला आहे. काही भागात अजून सोयाबीनचे पीक पाण्याखाली आहे. पावसानंतर वीज गुल झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता.

भुईमुगाच्या शेंगांना कोंब

दिंडोरी : तालुक्यात रविवारी (ता. १३) सायंकाळी पाच ते सहादरम्यान पावसाने दमदर हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सकाळी-रात्री पावसामुळे दिवसातून तीन वेळा औषध फवारणी करावी लागते आहे.

त्यामुळे उत्पादन खर्च सध्या वाढतो आहे. सोयाबीन, भुईमूग आदी पिके काढणीस आलेली असून, उघडीप नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भुईमुगाच्या शेंगा शेतातच सडू लागल्या असून, काहींना कोंब फुटत आहेत. एकूणच यंदाचा पाऊस खरीप हंगामासाठी हानिकारक ठरला आहे. (latest marathi news)

Rain water collected in Pimpalgaon Baswant vineyards & water collected in harvested maize of old Shemli farmer Nandlal Suryavanshi.
Jalgaon Heavy Rain : परतीचा पाऊस नुकसानीस कारणीभूत! चाळीसगाव तालुक्यात कपाशीसह इतर पिकांनाही फटका

कांदारोपांची लागली वाट

नरकोळ : केरसाणेसह परिसरातील दसाणे, मुंगसे, पिंगळवाडे, नरकोळ, जाखोड, मुंगसेपाडा येथे परतीच्या पावसाचा रोज सायंकाळी पाच ते रात्री आठच्या दरम्यान दणका बसत आहे. रविवारीही पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.

उन्हाळी हंगामातील कांदारोपांसाठी टाकलेल्या महागड्या बियाण्याची वाट लागली आहे. आता पुन्हा दुबार बियाणे उपलब्ध नसल्याने काय करावे या काळजीत शेतकरी पडले आहेत. खरिपातील मका, बाजरी कापणीवर आल्याने ती कशी होईल याची शेतकऱ्यांना चिंता आहे.

पिकांत गुडघाभर पाणी

जुनी शेमळी : जुनी शेमळी परिसरात परतीच्या पावसाने पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पिकांची वाट लागली असून, पिके सडू लागली आहेत. येथील शेतकरी नंदलाल सूर्यवंशी यांच्या नऊ एकर क्षेत्रातील कापणी केलेल्या मक्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

किरातवाडी, नागझरी, पहाडेश्वर, अजमीर सौंदाणे, नवी शेमळी येथे पावसामुळे दाणादाण उडाली असून, मका, बाजरी कापणीही रखडली आहे. या पावसाने विहिरी तुडुंब भरू लागल्या आहेत. कांदारोपांचेही मोठे नुकसान झाले आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, कोथिंबिरीचेही अतोनात नुकसान झाले आहे.

मक्याचे पीक हातातून जाणार

तळवाडे दिगर : तळवाडे दिगरसह बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी, जोरण, भिलदर, कपालेश्वर, मोरकुरे, पठावे परिसरातील परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. मका पीक हातून जाणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

कांदारोप, मिरची, फ्लॉवर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाने कांदारोपांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदारोपे वाचविण्यासाठी महागडी औषधे, फवारणी करावी लागत आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Rain water collected in Pimpalgaon Baswant vineyards & water collected in harvested maize of old Shemli farmer Nandlal Suryavanshi.
Nashik Heavy Rain : बागलाणमध्ये परतीच्या पावसाने दाणादाण! मदतीची माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.