नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील लहान आणि मोठ्या एकूण ३४ जनावरांचा बळी घेतला आहे. याशिवाय ९० घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पावसाळ्यात पडावा तसा पाऊस सध्या जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात पडत आहे. नाशिकमधील १५ तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतीची तर हानी झालीच; परंतु अनेक गायी, म्हशी, बैल, शेळ्या यांसारख्या पाळीव जनावरांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. (heavy rain 34 animals died due to bad weather in district )