Nashik Monsoon Season : इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम; 24 तासांत पुन्हा 93 मिलिमीटरची विक्रमी बरसात

Nashik News : इगतपुरी तालुक्यात सलग आठ दिवसांपासून संततधारेसह मुसळधार कोसळत असून, त्यात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
Heavy rain continues in Igatpuri
Heavy rain continues in Igatpuri esakal
Updated on

Nashik News : इगतपुरी तालुक्यात सलग आठ दिवसांपासून संततधारेसह मुसळधार कोसळत असून, त्यात पावसाचा जोर अधिकच वाढल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे शुक्रवारी (ता. २६) पुन्हा दारणा, वाकी, भाम या नद्या अधिक जोराने प्रवाहित झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत पुन्हा विक्रमी ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Heavy rain continues in Igatpuri taluka)

घोटी, इगतपुरीत सर्वाधिक पाऊस झाला असून, दोन्ही शहरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सलग होणाऱ्या मुसळधारेमुळे भावली व भाम धरण १०० टक्के भरले असून, दारणा धरणांसह तालुक्यातील धरणांमध्ये साठा वेगाने वाढत आहे. इगतपुरी तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भात शेतामध्ये शुक्रवारी तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

पूर्व भागात झालेल्या जास्त पावसामुळे भातलागवडीच्या कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. दारणा, भाम व वाकी या नद्या या मोसमात सलग सहा-सात दिवसांपासून दुथडी वाहत आहेत. इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. (latest marathi news)

Heavy rain continues in Igatpuri
Nashik Dam Water Storage : नाशिक धरण समूहाचा साठा 41.96 टक्क्यांवर!

या भागात आठ दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम राहिले आहे. मात्र रात्रभराचा पाऊस हा अतिवृष्टीसदृश होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

दरम्यान, घोटी, इगतपुरी व परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, संततधारेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पूर्णपणे जनजीवन विस्कळित झाले आहे. हा पाऊस रात्रीपासून आज उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला.

Heavy rain continues in Igatpuri
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.