सिन्नर : तालुक्याच्या पश्चिमभागातील चास नळवाडी परिसराला बुधवार व गुरुवार या दिवशीच्या सायंकाळी हस्त नक्षत्राच्या मुसळधार पावसासह मोठा तडाखा बसला असून रस्ते शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात पाणी साचलेले होते.
या अवकाळी पावसाने शेतातील, बाजरी, मका, जनावरांचा हिरवा चारा भुईसपाट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Nashik Heavy Rain Farmers lost their grass 2 acres of millet land in Chas with rain drops)
(ता.27) सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने अक्षरशा चास परिसरात धुमाकूळ घातला. आधीच बाजारभाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे,
त्यातच बुधवारी व गुरुवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे, चास येथील शेतकरी दत्तात्रय केरू खैरनार व त्यांचे बंधू बाळासाहेब केरू खैरनार यांच्या सुमारे दोन एकर बाजरीच्या शेतात पावसामुळे शेतातील बाजरी, जनावरांचा हिरवा चारा शेतात आडवा होऊन भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी आलेल्या वादळामुळे शेतातील हाताशी आलेल्या बाजरी, पिकांना मोठा फटका बसला.
सुमारे एक तासाहून अधिक चाललेल्या पावसाच्या टपोऱ्या थेंबांच्या पावसाचा तडाखा बाजरी, , मका, पिकाला मोठ्या प्रमाणात बसला. वादळी वाऱ्यासह व दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी फुलोऱ्यात आलेले बाजरीचे भुईसपाट झाले. बाजरीचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी पीक झोडपून निघाले. बाजरीचे दाणे भरलेली कणसे पावसाच्या पाण्यामुळे अधिक भारदस्त झाली, जड झालेली पिकांची ताटे वाऱ्यामुळे जमिनीवर झोपली गेली. मोठे नुकसान झाले.
दुसऱ्या पिकांवर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. काहीकाळ परिसरातील वीजपुरवठासुद्धा खंडित झाला होता. सुदैवाने घर, गोठा आदी मालमत्तेचे मात्र नुकसान झाले नाही.
तर या पावसामुळे सिन्नरच्या काही भागात आनंदाचे वातावरण होते तर चास खोऱ्यात या पावसाने अक्षरशा शेतातील पिकांची दैना उडून दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.