Nashik Monsoon Update : इगतपुरीत संततधारेसह मुसळधार पाऊस; 24 तासांत 35 मिलीमीटरची नोंद

Nashik News : पावसाचे माहेरघर असणाऱ्या शहरासह तालुक्याच्या पश्‍चिम पट्टयासह इगतपुरी शहर आणि कसाराघाट परिसरात सलग दोन दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस होत आहे.
Due to heavy rain in Tringalwadi area in the western part, such water has started gushing from the waterfall.
Due to heavy rain in Tringalwadi area in the western part, such water has started gushing from the waterfall.esakal
Updated on

Nashik News : पावसाचे माहेरघर असणाऱ्या शहरासह तालुक्याच्या पश्‍चिम पट्टयासह इगतपुरी शहर आणि कसाराघाट परिसरात सलग दोन दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासात ३५ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. इगतपुरी, घोटी शहरात आठवडे बाजार विस्कळीपणे भरला होता. (Nashik Heavy rain with torrential rain in Igatpuri record of 35 millimeters in 24 hours)

पावसाबरोबर दाट धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गावरील वाहतूक मंदावलेली होती. पावसामुळे भात शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम दिसून येत आहे. घोटी व इगतपुरी शहराच्या विविध भागात पाणी तुंबले आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पावसाची धार तुटत नसल्यामुळे धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

अति पावसाच्या भागात पावसाने दुसऱ्या टप्प्यात पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्‍चिम पट्टयातील भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरी सदो, नांदगावसदो, घोटी, देवळे टाकेघोटी, कावनई, कारवाडी, अवळखेड, चिंचलेखैरे, पूर्व भागातील गोंदे.

पाडळी देशमुख, अस्वली, मुकणे जानोरी, नांदगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, टाकेद, साकुर, शेणीत, माणिकखांब, देवळे, खैरगाव, आंबेवाडी, इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, तळेगाव, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. (latest marathi news)

Due to heavy rain in Tringalwadi area in the western part, such water has started gushing from the waterfall.
Nashik Police Recruitment : खाकी वर्दीसाठी झटणाऱ्या युवतींचे परिश्रम फळाला!

जलसाठ्यातील वाढ (टक्केवारीत)

धरण : साठा

दारणा : ३५ .०४

मुकणे : ०९.७७

वाकी : ०५.२२

भाम : ३८.४७

भावली : ४५.९६

वालदेवी : १५.५३

गंगापुर : २९.०४

Due to heavy rain in Tringalwadi area in the western part, such water has started gushing from the waterfall.
Nashik Police : शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन! परिमंडळ दोनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चेकिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.