SAKAL Exclusive : विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार कमबॅक झाले. परंतु या दोन दिवसांच्या कोसळधारेने शहरातील पायाभूत सुविधांचे पितळ उघडे पाडले. अर्धा तासाच्या पावसाचे पुढचे पाच ते सहा तास शहराला वेठीस धरले. कुठे वाहतूक ठप्प, तर कुठे पाणी विसर्गाला मार्ग नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या मागच्या सर्व कारणांचा शोध घेतल्यानंतर प्रशासनाची धोरण अवलंबिण्याची धरसोडवृत्ती जेवढी जबाबदार तेवढाच नागरिकांचा निष्काळजीपणा नागरिकांचादेखील दिसून आला. (Heavy rains exposed infrastructure of city)