Nashik News : कळवण-अभोणा रस्ता बनलाय मृत्युचा सापळा!

Nashik News : अभोणा- कळवण रस्त्यावर ट्रॅक्टर, ट्रक व मोठमोठे कंटेनर यांसारख्या अवजड वाहनांमुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळित होत आहे.
Two-way rush of vehicles to weigh on Abhona Kalwan road.
Two-way rush of vehicles to weigh on Abhona Kalwan road.esakal
Updated on

Nashik News : अभोणा- कळवण रस्त्यावर ट्रॅक्टर, ट्रक व मोठमोठे कंटेनर यांसारख्या अवजड वाहनांमुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळित होत आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या बेशिस्त वाहतुकीमुळे गेल्या आठवड्यात एका निष्पाप बालिकेला व महिलेला आपला जीव गमवावा लागल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. (Heavy vehicles like tractors trucks and big containers are disrupting traffic on Abhona Kalwan road)

येथे व परिसरात शहराच्या चहूबाजूने जवळपास शंभर ते दीडशे कांद्याचे मोठमोठे शेड आहेत. शिवाय कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समिती असे दोन मार्केट असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाहने, मजुरांसाठी वाहतूक करणारे पिकअप व परराज्यात कांदे घेऊन जाणारे अवजड कंटेनर यांची सतत वर्दळ असते.

मार्केटमधील लिलावानंतर वजन करण्यासाठी याच रस्त्यालगत भुईकाटे असल्याने वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागत असतात. कांद्याची आवक जास्त असल्यास ही वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. कांद्याने भरलेली ही वाहने अवजड असल्याने, रस्त्याच्या खाली उतरत नाहीत. (latest marathi news)

Two-way rush of vehicles to weigh on Abhona Kalwan road.
Nashik News : ‘काश्‍यपी’मधून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

त्यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी व स्कूलबसमधून प्रवास करणारे विद्यार्थी यांना बेशिस्त वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर ट्रॅक्टर वाहतुकीमुळे डांबरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. अनेक दुचाकी वाहने या चिखलाने अपघातग्रस्त झाल्याने दुचाकीचालक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने याबाबत तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

"सर्व कांदाशेड मालकांना नोटीस पाठवून वाहन पार्किंगबाबत सूचना दिल्या आहेत. वजन काट्यावर वाहनांची चढाओढ न करता शिस्तीने एकाबाजूला रांगेत सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सूचित केले आहे. बेशिस्त वाहनचालकांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. सर्व वाहनधारकांना रिफ्लेक्टर पट्ट्या लावण्याची सक्ती केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही रस्त्यावरील खड्डे तसेच पुलाच्या अपूर्ण कामाबद्दल पत्र पाठवून दुरुस्तीची सूचना केली आहे." - यशवंतराव शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अभोणा.

Two-way rush of vehicles to weigh on Abhona Kalwan road.
Nashik ZP News : जिल्हा परिषदेत 78 कर्मचाऱ्यांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.