Nashik News : सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथील हेडगेवारनगर येथील पुलाचे काम आठ ते नऊ महिन्यापासून रखडले आहे. दत्तमंदिर चौकापासून आयटीआय पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली.
मात्र, याच परिसरातील पुलाचे काम रखडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. रखडलेल्या कामामुळे हा रस्ता सात ते आठ महिन्यापासून बंद असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. (Hedgewarnagar bridge work incompleted)