SAKAL Exclusive : हेमंत गोडसेंना विरोध असतानाही उमेदवारी का? मुख्यमंत्र्यांच्या नाशिकसंदर्भातील हट्टाचे कारण उलगडले

Nashik News : महायुतीचे मोठ्या फरकाने पराभूत झालेले उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासंदर्भात मोठी नाराजीची लाट असतानाही त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी का दिली.
Hemant Godse,  Chief Minister Eknath Shinde
Hemant Godse, Chief Minister Eknath Shindeesakal
Updated on

Nashik News : महायुतीचे मोठ्या फरकाने पराभूत झालेले उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासंदर्भात मोठी नाराजीची लाट असतानाही त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी का दिली, या संदर्भातील चर्चा आता घडू लागल्या आहेत. आपली जागा धोक्यात आहे, ही माहिती असूनही शिंदेंनी गोडसे यांच्यासाठी एवढा विरोध का पत्करला, याबाबत काही तथ्य ‘सकाळ’च्या हाती लागले आहेत. (Nashik Hemant Godse was nominated by Chief Minister Eknath Shinde even though there was wave of displeasure regarding candidate)

मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने गुप्तचर यंत्रणा ते पोलिस यंत्रणांपर्यंतचे अहवाल त्यांच्याकडे नियमित येत असतात. या दोन्ही संस्थांनीही हेमंत गोडसे यांच्यासंदर्भात नकारात्मक अहवाल दिले होते. त्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांचेही पक्षीय अहवाल त्यांच्याविरोधात होते. गोडसे यांच्या कामासंदर्भात सर्वसामान्य लोकांमध्येही नाराजी होती.

कुठलाही घटक त्यांना उमेदवारी द्यावी, यासाठी अनुकूल नव्हता. त्यामुळे गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हायला खूप दिवस वाया गेले. कोणत्याही पक्षाला तिकीट द्यायचे झाल्यास ‘निवडून येण्याची क्षमता’ हा निकष सर्वांत आधी तपासला जातो. गोडसे यांची निवडून येण्याची शक्यता शून्याच्याही खाली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा निकषही त्यांच्यासाठी बाजूला ठेवला.

मग अशा कोणत्या मुद्यांचा विचार करून गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली, याची माहिती घेतली असता, व्यावहारिक जगात न पटणारी माहिती समोर आली. एकनाथ शिंदे जेव्हा मूळ शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याबरोबर सुरवातीला जाणारे हेमंत गोडसे होते. शिवाय, जे १२ खासदार शिंदेंसोबत गेले, त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम गोडसे यांनी तेव्हा केले होते.(latest marathi news)

Hemant Godse,  Chief Minister Eknath Shinde
Nashik Lok Sabha Election 2024 Result : ‘डमी’ भगरे हरले, ‘ओरिजनल’ भगरे जिंकले!

नेत्याबद्दलची एकनिष्ठता गोडसे यांनी कसोशीने पाळली होती. भावना गवळी यांचे तिकीट कापले गेल्याने शिवसेनेत अस्वस्थता होती. ही अस्वस्थता आमदारांपर्यंतही पोहोचली होती. जर शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आलेल्यांना तिकीट मिळणार नसेल, तर एवढी संकटे झेलून आल्याचा काय फायदा? असा प्रश्न सर्वच आमदार, खासदारांकडून उपस्थित होऊ पाहत होता.

त्यामुळे नव्याने पक्ष सांभाळणारे, मुख्यमंत्रिपदाची धुरा पेलणारे एकनाथ शिंदे यांच्यापुढे मोठा पेच होता. जागा गेली तरी चालेल; पण आपल्याबरोबर येणाऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, त्यांना सांभाळले पाहिजे, ही एकमेव भावना जपत शिंदे यांनी गोडसेंवर विश्वास दर्शविला.

मात्र, केवळ मोदी लाटेच्या आशेवर असलेल्या हेमंत गोडसे यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गोडसे यांच्यासाठी तर तिकीट मिळविणे, हेच एकमेव लक्ष्य होते. त्यानंतर आपोआप निवडून येऊ, या आशेवर ते राहिले. मोदींसाठी भाजपला काम करावेच लागेल, हा गोडसेंचा विचारही भाबडा ठरला. राजाभाऊ वाजे यांनीच अखेर मैदान मारले. ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा कोणताही प्रयत्न हेमंत गोडसे यांच्याकडून शेवटपर्यंत झाला नाही.

Hemant Godse,  Chief Minister Eknath Shinde
Nashik Lok Sabha Constituency : गृहीत धरण्याची प्रवृत्ती नाशिककरांनी लाथाडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.