Nashik News : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेत आता प्रवेशासाठी वशिलेबाजीला चाप बसणार असून, १०० टक्के गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी समाजकल्याण वसतिगृह प्रवेशामधील १५ टक्क्यांचा विशेष कोटा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (High Court decision on reserved hostel quota is canceled )