येवला : दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या अवर्षणप्रवण येवला तालुक्यात यंदा परतीचा धो-धो पाऊस कोसळून विक्रमी ६८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण खरीप प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस सरतेशेवटी आला, पण तालुक्यात कमीअधिक पडत दुजाभाव केल्याने उत्तर पूर्व भागातील अनेक गावात शेतीसह पिण्याच्या पाण्याचे गणित बिघडलेलेच आहे. अवर्षणप्रवण तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी अवघी ४८८ मिलिमीटर असून ती गाठताना देखील मुश्कील होते. ( Highest rainfall still needed for Rabi Avartan Yeola taluka received 138 percent of average rainfall )