Nashik Accident : दादा, माझा भाऊ व वहिनी हे कुठे गेले सांगा ना?

Dead Boiled Couple
Dead Boiled Coupleesakal
Updated on

सिन्नर : दादा, माझा भाऊ व वहिनी हे कुठे गेले सांगा ना? निधीला व मधुराला आता काय सांगायचे, असा आक्रोश अपघातग्रस्त व मृत्युमुखी असलेल्या नरेश उबाळे यांचे बंधू राजेंद्र मनोहर उबाळे यांचे वाक्य होते.

अंबरनाथ येथून लक्ष्मी पेंटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामगारांच्या शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनासाठी १५ खासगी ट्रॅव्हल बस केलेल्या होत्या. अंबरनाथ येथील हे भाविक देवदर्शनासाठी जात असतात. यातील अंबरनाथ गावापासून आसपासचे नागरिकही या ट्रॅव्हल्समध्ये देवदर्शनासाठी चालले होते. (Nashik Highway Accident Rajendra Manohar Ubale brother of Naresh Ubale who suffered an accident and died Brother ask question to people about died brother and sister in law Nashik Accident News)

Dead Boiled Couple
Nashik News: नाशिककरांवर करवाढ अटळ राहण्याची शक्यता! दप्तरी दाखल ठरावावरून हायकोर्टाची राज्य शासनाला विचारणा

शिर्डी येथे दर्शनासाठी जात असताना शुक्रवारी पहाटे पाथरे येथे ट्रॅव्हल व ट्रकचा भीषण अपघात होऊन दहा जण मृत्युमुखी, तर २५ जण जखमी झाल्याची वार्ता सर्वत्र समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. शासकीय यंत्रणा, तसेच सिन्नर येथील रुग्णवाहिका यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना सिन्नर येथील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी रुग्णांना योग्य ते औषध उपचार करून सर्व मदत केली असता, यातील अनेकांचे कुटुंब हे अपघातात मृत्युमुखी पडल्याचे समजते. यामधील नरेश व वैशाली उबाळे हे दोघे आपल्या चिमुकल्यांना पारखे करून मृत्यूच्या दाढेत गेले. अतिशय छोटी निधी उबाळे ही यशवंत हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल असताना तिला आपले आई-वडील हे अपघातात कायमस्वरूपी गेल्याचे कळालेसुद्धा नाही.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Dead Boiled Couple
Nashik News : होळकर पुलावरील पादचारी मार्गाला भेगा

नरेश मनोहर उबाळे व वैशाली नरेश उबाळे हे दोघेही मोरवली (अंबरनाथ) येथे राहतात. नरेश हा दुकान कामगार असून, त्यांच्या संसाराच्या वेलीला दोन कळ्या उमलल्या. यातील पहिली मुलगी मधुरा ही दहा वर्षांची असून, दुसरी निधी आठ वर्षांची आहे.

निधीचे आई-वडील हे दोन्हीही अपघातात मृत्युमुखी झाल्याने शासकीय रुग्णालयात नरेश यांचे नातेवाईक व भाऊ यांचा आक्रोश पाहणाऱ्यांना अश्रू रोखणे अवघड झाले. अंबरनाथ येथील संजय मगर, वैशाली थेटे, प्रदीप पाटील, उमेश पाटील, येथील माजी नगरसेवक यांनी सर्व मदत करून मृतांना रुग्णवाहिकेमध्ये अंबरनाथ येथे नेण्याचे मदतकार्य केले. या वेळी शासकीय रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी झालेली होती.

Dead Boiled Couple
Nashik News : नैताळे येथे गणेश मूर्तीची विटंबना- संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.