Nashik News : अजान ते आरती गोदाकाठी नांदतय समतेचं पीक! ऐतिहासिक चांदोरी गाव जपतंय सामाजिक सलोखा

Nashik : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करावी अस चांदोरी गाव. खळखळून वाहणारी गोदावरी नदी, अन् त्याच पात्रात अनेक चांगल्या वाईट पुरांची साक्ष देणारी ऐतिहासिक मंदीरे इथली धार्मिक ओळख जपत आहे.
Village Maruti Temple, Mosque
Village Maruti Temple, Mosqueesakal
Updated on

Nashik News : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करावी अस चांदोरी गाव. खळखळून वाहणारी गोदावरी नदी, अन् त्याच पात्रात अनेक चांगल्या वाईट पुरांची साक्ष देणारी ऐतिहासिक मंदीरे इथली धार्मिक ओळख जपत आहे. खंडेराव महाराजांपासून महाकाल म्हणवणाऱ्या शंकरापर्यंत इथल्या मंदिरात कायम धार्मिक वातावरण असते. यासह दुसऱ्या बाजूला गावातील मुस्लिम बांधवांची देखील मशीद असून दोन्ही धर्म इमाने इतबारे आपापल्या धार्मिक प्रतीकांची आराधना करतात. (nashik Historical Chandori village preserves social harmony of hindu and muslim unity marathi news)

विशेष म्हणजे कित्येकदा दोन्ही धर्मीयांचे सण उत्सव एकाच दिवशी आले. तरीही कुठलाच धार्मिक तणाव इथे बघायला मिळाला नाही. यामुळे अजान ते आरती गोदाकाठी वेगळेच वातावरण नेहमी अनुभवास मिळते.

अनेकदा स्वार्थासाठी काही विघ्नसंतोषी लोक समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात. यात हिंदू- मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे अनेकजण आहे. मात्र या सर्व गोष्टींचा नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील ग्रामस्थांना कोणतीही बाधा होत नाही. कारण येथील लोक एकमेकांसोबत एकमेकांच्या धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहत आहे.

गावात ग्रामपालिकेच्या नजीक हनुमान मंदिर, दत्त मंदिर व मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ आहे. हनुमान जयंती, रमजान ईद व दत्तजयंती सह इतर ही सर्व उत्सव आजही या गावात सर्वधर्मीय भक्तिभावाने साजरे केले जातात. एका बाजूला आरती तर दुसऱ्या बाजूला अजान असते. मात्रा याचा कधीच येथील ग्रामस्थांना त्रास झालेला नाही.

ज्यावेळी हिंदूंचे सण असतात तेव्हा या गावात मुस्लिम बांधव देखील तो सण उत्साहात साजरा करतात तर जेव्हा मुस्लिमांचा सण असतो तेंव्हा हिंदू धर्मीय तेवढ्यात भक्तिभावाने त्यांच्या उत्साहात सहभागी होत असतात. गावात राजकीय गट तट असले तरी यात्रा, शिवजयंती, भीमजयंती, गणेशोत्सव, रमजान ईद या सारख्या सर्वधर्मीय सणांमध्ये धार्मिक सलोखा जपला जातो.(latest marathi news)

Village Maruti Temple, Mosque
Nashik News : सप्तश्रृंगगडासाठी ई-बसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद! आठवड्यात 2 लाख 32 हजाराचा व्यवसाय

''सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करताना चांदोरी गावातील कार्यक्रमांचा आदर्श घेत दोन समाज एकत्र आल्याने बंधुत्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे.''- विशाल नाईकवाडे, तहसीलदार निफाड

''चांदोरीकर ज्या पद्धतीने सामाजिकपणा जोपासतात, त्याचा आदर्श नक्कीच इतरांनी घ्यायला हवा. सामाजिक सलोखा राखण्यात चांदोरीचे ग्रामस्थ कौतुकास्पद काम करतात.''- विकास ढोकरे, सहायक पोलिस निरीक्षक, सायखेडा

''चांदोरी गावात वर्षानुवर्षे सर्वधर्मीय बंधू लोक एकमेकांशी कौटुंबिक संबंध जपून आहेत.एकमेकांच्या सुखदुःखात ते कायम सहभागी होत असतात.''- विनायक खरात, सरपंच, ग्रामपालिका चांदोरी

''चांदोरी गावातील हिंदू मुस्लिम बांधवांचा एकमेकांशी असलेला स्नेह, दृष्टिकोन हे गावच्या सामाजिक सलोख्याचे महत्त्व आहे. एकमेकांच्या प्रत्येक उत्सवात तन, मन, धनाने सहभागी होत असतात.''- मुश्ताक इनामदार, चांदोरी

Village Maruti Temple, Mosque
Nashik News : भुजबळ फार्म हाऊसवर ड्रोनप्रकरणी एकाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.