सातपूर (नाशिक) : प्लॉटच्या व्यवहारापासून ते प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा नाहरकत दाखला मिळविण्यापर्यंत उद्योगांशी संबंधित ९० टक्के कामे सातपूरच्या उद्योगभवनमध्ये होतात; परंतु उद्योगभवन खऱ्या अर्थाने उद्योगाचे केंद्र आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्याला कारण म्हणजे सरकारी बाबूंपेक्षा हायटेक एजंट अशा पद्धतीने काम करून देतात. मात्र त्यासाठी एजंट सांगेल, ती रक्कम द्यावी लागते. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर अशी कामे होत असताना त्यांना अडविले जात नाही. (Hitech agents become headache for industries)