Holi Festival : रहाड संस्कृतीत ‘मधली होळी’ पुनर्जीवित; रंगप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण

Holi Festival : रंगपंचमीतील शहरातील रहाड संस्कृतीत मधली होळी रहाडीची भर पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रंगप्रेमींकडून पाच रहाडीत रंग खेळण्याचा आनंद घेतला जात होता.
Puja was performed on the exposed part of Madhali Holi Rahadi found during pipeline digging.
Puja was performed on the exposed part of Madhali Holi Rahadi found during pipeline digging.esakal
Updated on

Holi Festival : रंगपंचमीतील शहरातील रहाड संस्कृतीत मधली होळी रहाडीची भर पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रंगप्रेमींकडून पाच रहाडीत रंग खेळण्याचा आनंद घेतला जात होता. आता सहा रहाडींमध्ये रंग खेळता येणार आहे. शहरात होळीच्या पाच दिवसानंतर रंगपंचमी साजरी केली जाते. पारंपारिक रहाडीत रंग खेळण्याचा काही वेगळाच उत्साह असतो. (nashik Holi Festival Madhli Holi revived in Rahad culture marathi news)

जुने नाशिक आणि पंचवटी शनी चौक रहाडींमध्ये रंग खेळण्यासाठी शहरातील रंगप्रेमींची गर्दी उसळते. रहाडीत रंग खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. त्यामुळे जुने नाशिक, पंचवटी भागात विविध ठिकाणी पेशवेकालीन रहाडी आहे. जुन्या जाणकारांकडून सुमारे २२ रहाडी असल्याचे सांगितले जाते. त्यातील सर्वाधिक जुने नाशिक परिसरात असल्याचे सांगण्यात येते.

सध्या काझीपुरा, जुनी तांबट लेन, तिवंधा चौक, गाडगे महाराज पूल परिसरात तसेच पंचवटी येथील शनी चौक भागातील अशा चार पेशवेकालीन रहाडी आहेत. यात मधली होळी भागातील आणखी एका रहाडीची भर पडणार आहे. १९५५ ला काही कारणास्तव ही रहाड बंद करण्यात आली होती. सध्या जुने नाशिक परिसरात स्मार्टसिटीअंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.

त्याअंतर्गत मधली होळी भागात खोदकाम सुरू असताना रहाडीचा काही भाग उघडा पडला. मधली होळी तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत, रहाडीच्या उघड्या पडलेल्या भागाची विधिवत पूजा केली. भद्रकाली पोलिस ठाणे, महापालिका, स्मार्टसिटी कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून रहाड पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marathi news)

Puja was performed on the exposed part of Madhali Holi Rahadi found during pipeline digging.
Holi Festival : होळीचे रंग ठरू शकतात जीवघेणे; श्वसन विकारापासून सावध राहा

रहाडीच्या मध्य भागातून स्मार्टसिटीअंतर्गत मोठी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ती पाइपलाइन अन्य ठिकाणी वळविण्यात यावी, अशी मागणी स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

केवळ नैसर्गिक रंगांचा वापर

मधली होळी रहाडीत केवळ नैसर्गिक रंगांचा वापर होणार आहे. फुलांपासून रंग तयार करण्यात येऊन रंगप्रेमींना तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून रंग खेळणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. याची दक्षता रहाड उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. दरवर्षी विविध रंगी नैसर्गिक रंग असणार आहे.

चार वर्षात दोन राहडींचे पुनर्जीवन

गेल्या चार वर्षात जुनी तांबट लेन त्यानंतर काझीपुरा अशा दोन रहाडी पुनर्जीवित करण्यात आल्या आहे. सुमारे २२ रहाडी असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही वर्षात इतरही भागातील रहाडी पुनर्जीवित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास पुन्हा पेशवेकालीन रहाड उत्सवाचा सर्वत्र बोलबाला होणार आहे.

''रंगपंचमीपूर्वी पाइपलाइनचे काम झाल्यास यंदापासूनच रंगप्रेमींना रंग खेळण्यासाठी रहाड उघडी करून देण्यात येईल. अन्यथा पुढच्या वर्षापासून नियमित रहाड उघडी केली जाईल.''- सतीष काथे, मधली होळी, तालीम संघ अध्यक्ष

Puja was performed on the exposed part of Madhali Holi Rahadi found during pipeline digging.
Jalgaon Holi Festival : मुस्लिम कुटुंब वाढवताय होळीचा गोडवा! साखर महागल्याने हार-कंगणच्या दरात वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.