इंदिरानगर : रिक्षातून प्रवास करत असताना १२ तोळे सोन्याची दागिने असलेली बॅग रिक्षात विसल्यानंतर रिक्षाचालक यांनी ती प्रामाणिकपणे परत केली. याबद्दल पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी रिक्षाचालक याचा सत्कार केला. (Nashik honesty of rickshaw driver Indiranagar marathi news)
इंदिरानगर येथील रिक्षाचालक राहुल अशोक सुके हे रोजच्याप्रमाणे त्याच्या रिक्षामधून (एमएच १५ एफयु ९८९४) सम्राट स्वीटस जवळील साईबाबा मंदिर येथे उभे होते. यावेळी येथील सोनाली पोरजे या सोन्याची दागिने बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यासाठी सुके यांच्या रिक्षाने शालीमार येथे गेल्या. त्यानंतर तिथून श्रीमती. पोरजे कॉलेज रोड येथील एका बँकेत गेल्या.
बँकेत गेल्यावर त्यांना आपण बॅग रिक्षामध्येच विसरुन गेल्याचे कळले. त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे येथे जात दागिने असलेली बॅग गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर राहुल सुके हे रिक्षा चालक सदर बॅग घेऊन पोलिस ठाण्यात येत त्यांनी रिक्षात विसरलेली श्रीमती. पोरजे यांची बॅग वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याकडे सुपूर्द केली. (latest marathi news)
त्यानंतर बॅगेतील दागिने तसेच बँकेचे कागदपत्र यावरून सदर महिलेचा माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या मदतीने शोध घेऊन सदर दागिने पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत सदर महिलेला परत करण्यात आले.
यावेळी रिक्षा चालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल राऊत यांनी सुके यांचा सत्कार करून त्यांना प्रामाणिकतेचे बक्षीस पत्र दिले. यावेळी विनोद दळवी, सचिन राणे, रमाकांत क्षीरसागर, शिवा तेलंग, नीलेश राऊत, अशोक सुके, लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.