नाशिक : गंगापूर हददीमध्ये काही हॉटेल्समध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर चालविला जात असल्याची नेहमीच चर्चा होते. परंतु पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असे. मात्र, शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सावरगाव रस्त्यावरील बरॅको हॉटेलवर छापा टाकून तेथे बिनधास्तपणे सुरू असलेला हुक्का पार्लर उदध्वस्त केला आहे. या कारवाईत पथकाने सुमारे १० हजारांचे साहित्य जप्त करीत ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Nashik Hookah parlours destroyed in raid on Baraco Hotel )
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना बरॅको हॉटेलमध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर मिळाली होती. पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांना माहिती दिल्यानंतर, रविवारी (ता. २१) सापळा रचण्यात आला. त्यानुसार, पथकाने पहाटेच्या सुमारास सावरगाव रोडवरील बरॅको हॉटेलवर छापा टाकला.
त्यावेळी, हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का पार्लरची सुविधा बिनधिक्कतपणे पुरविली जात होती. या कारवाईत संशयित वेटर राहुल रमेश साळवे (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), मॅनेजर प्रशांत देवेंद्र खिल्लर (३०, रा. गोवर्धन गाव, गंगापूर रोड) यांच्यासह हुक्का सेवन करणारे संशयित साहिल जिभाऊ सोनवणे (२४, रा. मेनरोड, सटाणा), प्रतिक रमेश आहेर (२५, रा. शिवशक्तीनगर, जेलरोड)
आशितोष राजेश पगारे (२७, रा. शिवशक्तीनगर, जेलरोड), शुभम सुनिल पवार (२४, रा. शिवशक्तीनगर, जेलरोड), विशाल रमेश देशपांडे (४०, रा. काळेनगर, गंगापूर रोड), विशाल विजय व्हिजन (४२, रा. बळवंतनगर, गंगापूर रोड), निखील सुभाष पाटील (३९, रा. नवीन पंडित कॉलनी, नाशिक), संदिप दिनेश खंडेलवाल (४२, रा. विकास कॉलनी, त्र्यंबकरोड), पुरुषोत्तम ईश्वरदास उबराणी (४०, रा. रामेश्वरनगर, गंगापूर रोड) यांच्याविरुद्ध गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार गणेश भामरे, चंद्रकांत बागडे, अनिरुद्ध येवले यांनी सदरची कारवाई केली.
हुक्का ओढणार्यांनाही दणका
एरवी, हुक्का पार्लरची कारवाई झाल्यानंतर हॉटेलचालकांवर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे हुक्का ओढणारे सहीसलामत सुटून जातात. मात्र या गुन्ह्यात हॉटेलचा मॅनेजर व वेटरसह हुक्का ओढणार्याविरोधातही गुन्हा दाखल करीत त्यांनाही चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा प्रकारांना चाप बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.