लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (ता.५) रात्री आलेल्या महिलेचे बाळंतपण सुखरूप करूनही तिच्या नातेवाईक व आलेल्यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषा वापरल्याने कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात तपासणीसाठी आलेले रुग्णही सहभागी झाले होते. (staff abused protest at Lasalgaon rural hospital)