Nashik Fire Accident : मालेगाव रमजानपुरा भागात घरांना आग!

Nashik News : मालेगाव शहरातील रमजानपुरा भागातील बिस्मिल्लाह चौकातील दोन घरांना बुधवारी (ता. २९) दुपारी अचानक आग लागली.
Firefighters dousing the fire in Ramjanpura area.
Firefighters dousing the fire in Ramjanpura area.esakal
Updated on

मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागातील बिस्मिल्लाह चौकातील दोन घरांना बुधवारी (ता. २९) दुपारी अचानक आग लागली. अरूंद रस्ता, अतिक्रमणामुळे या भागात पोहचतांना अग्निशमन दलाला अनेक अडचणी आल्या. वाहनांसाठी वाट बिकट‌ असतांनाही अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून पाच बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. (House fire in Malegaon Ramzanpura area)

बिस्मिल्ला चौकातील मोहंमद इब्राहिम अब्दुल खालीक व मोहंमद इस्माईल नजिर मुकादम यांच्या राहत्या घराला ही आग लागली. शकिल अहमद यांनी मुख्य अग्निशमन केंद्रात या आगीची माहिती दिली. अग्निशमन अधिक्षक संजय पवार यांच्या सुचनेनुसार तत्काळ पाच अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

या ठिकाणी अडचणीचा, अरुंद रस्ता असल्याने वाहने घेऊन जाण्यास अग्निशमन दलास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चालकांनी मोठ्या कसोशीने घटनास्थळी वाहने पोहचवल्याने तत्काळ आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. श्री. पवार यांच्या उपस्थितीत जवानांनी तातडीने आग विझविल्याने संभाव्य हाणी टाळता आली. (latest marathi news)

Firefighters dousing the fire in Ramjanpura area.
Pune Porsche Accident: ते ब्लड सॅम्पल फक्त आरोपीच्या आईचे नाहीत तर.. डॉ पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर

संसारोपयोगी साहित्य, कपडे, भांडी व अन्नधान्य जळाले. नुकसानीचा निश्‍चित अंदाज समजू शकला नाही. आयुक्त रवींद्र जाधव, उपायुक्त राजेंद्र फातले घटनेवर लक्ष ठेऊन होते. आग विझविण्यासाठी श्री. पवार, अग्निशमन दलाचे जवान सुधाकर अहिरे, जालिंदर जाधव, अजय पवार, राशिद अख्तर.

शहबाज बेग, अमोल जाधव, रुपेश महाजन, विवेक जाधव, वाहनचालक हिरामण झनकर, जीवन महिरे, फिरोज पठाण, चंद्रकांत अहिरराव, विकास माळी यांनी परिश्रम घेतले. मनपा अग्निशमन दल व रमजानपुरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Firefighters dousing the fire in Ramjanpura area.
Tasgaon Accident : नातीच्या वाढदिवसाचा केक कापला अन्‌ काळाने घातला घाला; कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com