Nashik News : मंगळवारी (ता. १४) सायंकाळी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने हरसुल व तोरंगण परिसरातील अनेक गावांत मोठे नुकसान झाले. तोरंगण येथे वादळाने अनेक घरे व शाळांचे पत्रे उडाले. शिवाय परिपक्व होण्याच्या स्थितीत आलेल्या आंबा पिकालाही फटका बसला. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडावर आंबा दिसेनासा झाला आहे. (Houses damaged by storm in Torangan)
अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने पावसाळापूर्वीची तयारी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. जनावरांसाठी पावसाळ्यात लागणारी वैरण पावसामुळे भिजून गेली. घरांवरील छप्पर उडाल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले. वर्षभर मेहनत करून तयार झालेला आंबा नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी निवडणुकीत व्यस्त असून, नुकसानीची पाहणी करण्याची मागणी नागरिक करीत आहे. नवीन घरकुलाचे बांधकाम जमिनदोस्त झाले. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
"अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा व्यक्तींना शासनाने पावसापूर्वी तत्काळ नुकसान भरपाई द्यावी." - राहुल बोरसे, सरपंच, तोरंगण (latest marathi news)
"आम्ही आत्ताच नव्याने घर बांधले होते. वादळाने घरावरील सर्व पत्रे उडून गेल्यामुळे मी उघड्यावर आलो आहे. शासनाने तत्काळ मदत देऊन आधार द्यावा." - यशवंत बोरसे, नागरीक, तोरंगण
"वादळाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनास पाठविला जाईल." - श्वेता संचेती, तहसीलदार, त्र्यंबकेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.