HSC Result : बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. २१) दुपारी एकला ऑनलाइन जाहीर होणार आहे. नाशिक विभागातून या परीक्षेला सुमारे एक लाख ६८ हजार विद्यार्थी प्रविष्ट होते. काही दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा लागून असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) चा निकाल मंगळवारी (ता. २१) जाहीर होणार आहे. ( hsc 12th exam result today )
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागामार्फत नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मार्चमध्ये परीक्षा आटोपल्यानंतरही विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांना सामोरे जात होते. अद्यापही काही विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षांची तयारी सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झालेले असताना आता त्यापाठोपाठ राज्य शिक्षण मंडळातर्फेही बारावीचा निकाल जाहीर केला जात आहे.
येथे पाहा निकाल-
विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार (ता. २२) पासून ५ जूनपर्यंत मुदत दिली जाणार आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायापत्र मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करायचा आहे.
जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेसाठी सोमवार (ता. २७) पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन आवेदनपत्र भरता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येईल. तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षा आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ ची परीक्षा अशा दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.