Nashik News: बिहारमधून नाशिकमध्ये आणण्यात आलेल्या त्या बालकांना परत गावी नेण्यासाठी त्यांचे पालक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अनेक दिवसांनी मुलांना भेटल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले होते. रेल्वेतून या मुलांना नाशिक आणि जळगावमध्ये आणण्यात आलं होतं, यामागे मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात होता. (Nashik human traffiking News Parents of those children enter Nashik from Bihar)
रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या 'ऑपरेशन आहट' अंतर्गत केलेल्या संयुक्त कारवाईत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८ ते १५ वयोगटातील मुलांना घेऊन जाणाऱ्या ५ व्यक्तींसह ५९ बालकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्कप्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे यांनी ही माहिती दिली. यामध्ये जळगावमधील २९ तर नाशिक जिल्ह्यातील मनमाड इथून ३० बालकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. (Marathi Tajya Batmya)
ताब्यात घेतल्यानंतर या मुलांना बाल सुधारगृहात दाखल करण्यात आलं आहे. ही मुले कोण आहेत? बिहारहून हे नेमके कुठे निघाले होते? यामगे काही वेगळा उद्देश होता का? यामागे मानवी तस्करीचा प्रकार आहे का? अशा चर्चांना उधाण आलं होतं.
त्याचबरोबर ही मुलं बांगलादेशी असल्याचंही बोललं जात होत. पण ही मुलं बिहारची असल्याचं समोर आलं असून त्यांचे पालक त्यांना आपल्या घरी नेण्यासाठी नाशिक इथं दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर या पालकांची आपल्या मुलांसोबत भेट झाली. प्रशासनाकडून या मुलांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. (Latest Marathi News)
अनेक दिवसानंतर भेटल्यानं पालकही झाले भावनिक
पालक आणि मुलांची ओळख पटविण्याचं काम अद्याप सुरु असल्यानं मुलांचा ताबा अद्याप त्यांच्या पालकांच्या हाती देण्यात आलेला नाही. शासकीय तपास आणि कारवाई पूर्ण झाल्यानंतर मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं जाऊ शकतं, अशी माहिती मिळते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.