Nashik ICICI Bank Gold Theft : जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेतील पाच कोटींच्या सोने चोरून नेल्याप्रकरणात शहर गुन्हेशाखेने एका संशयिताला गुजरातमधून अटक केली आहे. तर दुसरा पोलिसांच्या हातातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. दीड महिन्यापूर्वी सदरची घटना घडली असून, २२२ ग्राहकांचे ५ कोटींचे सोने संशयितांनी चोरून नेले होते. मात्र पोलिसांना यात फक्त ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. (Nashik ICICI home finance Bank 5 crore Gold Theft case)
जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेतील लॉकरमधून २२२ ग्राहकांचे सुमारे ५ कोटींचे सोने संशयितांनी चोरून नेल्याची घटना ४ मे रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या घटनेला दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरीही गुन्ह्यातील संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
शहर गुन्हेशाखांची पथके संशयितांच्या मागावर परराज्यात होती. यातील एका पथकाला संशयित परराज्यातील देवदर्शन करून गुजरातमध्ये गेल्याचे समजले. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने गुजरात गाठत, हलोल शहरात संशयितांची शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी सोमवारी (ता. १७) संशयित स्वीफ्ट कारमधून (एमएच १२ एचव्ही ०८१८) जाताना दिसले.
पथकाला संशय आल्याने त्यांनी कारचा १० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. ज्या रस्त्याने संशयित जात होते, तो रस्ता पुढे बंद झाल्याने संशयितांनी कार सोडून जंगलाकडे पळ काढला. पथकाने त्यांचा पाठलाग केला असता, संशयित सतिश चौधरी (२७, रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) यास अटक करण्यात आली तर त्याचा साथीदार रतन जाधव मात्र पोलिसांच्या हातातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. (latest marathi news)
याप्रकरणात आत्तापर्यंत तुकाराम देवराम गोवर्धने (रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यास अटक केली आहे. या गुन्ह्यात कट रचणारा मुख्य संशयित वैभव लहामगे हा नाशिक ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात पहिलवान भूषण लहामगे याच्या खूनप्रकरणात अटक आहे. रतन जाधव व सतिश चौधरी यांचाही भूषण लहामगे खूनात समावेश होता. मात्र त्यानंतर ते पसार झाले होते. यातील सतिश चौधरीला अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी शहर गुन्हेशाखेच्या पथकाने केली.
सोन्याचा मुद्देमालाचे काय?
या गुन्ह्यात संशयितांनी सुमारे ५ कोटींचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत फक्त ३९ लाखांचे सोने पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुख्य संशयित वैभव लहामगेचा ताबा पोलिसांनी घेतलेला नाही. संशयित सतिश चौधरीकडूनही चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे जवळपास साडेचार कोटींचा मुददेमाल गेला कुठे याचा तपास पोलिसांना लागू शकलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.