Nashik News : केवायसी असेल तर निराधारांना मिळणार पेन्शन; 9 हजार निराधारांचे वैयक्तीक योजनेचे अनुदान थेट बँकेतच

Nashik News : संजय गांधी निराधार निवृत्तिवेतन योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अनुदानाचा लाभ घेत असलेल्या लाभाथ्यांचे अनुदान आता यापुढे थेट बँकेच्या खात्यात (डी.बी.टी.) जमा होणार आहे.
KYC
KYC esakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : संजय गांधी निराधार निवृत्तिवेतन योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अनुदानाचा लाभ घेत असलेल्या लाभाथ्यांचे अनुदान आता यापुढे थेट बँकेच्या खात्यात (डी.बी.टी.) जमा होणार आहे. त्यामुळे या वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्याचे केवायसी नसल्यास त्यांना अडचणी येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार राजेंद्र वराडे यांनी केले आहे. (If bank account is KYC destitute will get pension)

योजनेचे अनुदान ज्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा होते, त्या बँक खात्याशी संबंधितांनी आधार व मोबाईल क्रमांक संलग्न करून घ्यावा. आधारकार्ड, बँक खाते पासबुक, दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची झेरॉक्स व संलग्नीकरण केल्याची बँक पावती तहसील कार्यालयात तत्काळ जमा करावी. कागदपत्रे जमा न केल्यास व योजनेचा लाभ बंद झाल्यास याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहणार असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी स्पष्ट केले.

८९१२ लाभार्थी

सिन्नर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत ४०६०, श्रावण बाळ योजनेत २४२६, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेत २२७३, इंदिरा गांधी विधवा निवृत्तिवेतन योजनेत १४४ तर दिव्यांग योजनेत ९ असे सर्व योजना मिळून तालुक्यात ८९१२ लाभार्थी आहेत. संजय गांधी, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी या तीनही योजनांमध्ये प्रति लाभार्थी महिना १५०० रुपये इतके अनुदान दिले जाते. (latest marathi news)

KYC
Nashik NMC : महापालिकेच्या वर्षभरातील सेवांचे मूल्यमापनाचा निर्णय; राज्यसेवा हक्क आयोगाच्या सूचना

फक्त खाते जोडून घ्यावे

ज्या लाभार्थ्यांनी सदर कागदपत्रे यापूर्वी गावचे तलाठी अथवा तहसील कार्यालयात जमा केलेले आहेत त्यांनी पुन्हा कागदपत्रे जमा करू नयेत. आय.डी.बी.आय. बँक सिन्नर अथवा आय.डी.बी. आय. बँक गुळवंच येथे बँक खाते असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे इतर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असलेल्या बँक खात्याची झेरॉक्स प्रत करावी.

"लाभार्थ्यांनी आपले आधार, मोबाईल क्रमांक, राष्ट्रीयीकृत बँक खाते क्रमांकाशी संलग्न करावे." - सुरेंद्र देशमुख (तहसीलदार सिन्नर)

KYC
Nashik News : वटार सर्पदंश प्रकरणी 2 डॉक्टर निलंबित; जिल्ह्यात सर्पदंशाच्या 834 लस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.