Nashik Monsoon News : पावसाच्या माहेरघरातच पावसाचा दुजाभाव; भात लागवड उरकण्यासाठी जपानी पद्धतीचा वापर

Nashik News : भाताचे आगर तसेच पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात वरुणराजाने मागील पंधरवड्यात सलग चार-पाच दिवस चौफेर हजेरी लावून बळीराजाची सर्वत्र समाधानी व शेतामध्ये पावसाची आबादानी केली होती.
In order to speed up the work of rice cultivation in Bhandardarawadi, farmers are harvesting rice by following the Japanese method.
In order to speed up the work of rice cultivation in Bhandardarawadi, farmers are harvesting rice by following the Japanese method.esakal
Updated on

Nashik News : भाताचे आगर तसेच पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात वरुणराजाने मागील पंधरवड्यात सलग चार-पाच दिवस चौफेर हजेरी लावून बळीराजाची सर्वत्र समाधानी व शेतामध्ये पावसाची आबादानी केली होती. यातही पूर्व भागात मात्र दुजाभाव केला होता. गेल्या आठवडाभरापासून पावसाने तालुक्यात विश्रांती घेतली आहे. (Igatpuri Applying of Japanese method to complete rice cultivation)

तर काही भागात अधून-मधून बरसात सुरूच ठेवली आहे. यामुळे आता विविध भागासह आणि विशेष करुन दारणाकाठच्या गावांत मुख्य पीक असलेल्या भात आवणीच्या कामाला उशिर होत आहे. इतर भागात भात लागवडीच्या कामांना जोमाने सुरुवात झाली आहे. मात्र, मजुरांची टंचाई भासत असताना त्यावर मात करत बळीराजाने आता या कामाला वेग दिला आहे.

यंदा मॉन्सून वेळेत दाखल झाला नसला तरी उशीराने बरसणाऱ्‍या पावसाने गेल्या पंधरवड्यात लावलेली हजेरी व शेतात साचलेले पाणी आणि आता ओसरल्यामुळे भात आवणीच्या कामाला योग्य वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी जून-जुलैमध्ये होणारी आवणी यंदा उशिरा झाली. पावसाचे आदानप्रदान मंदावल्याने भात लागवड संथ गतीने होत आहे.

मजुरांची कमतरता लक्षात घेता काम लवकर उरकण्यासाठी जपानी पद्धतीचा वापर केला जात आहे. दरम्यान, उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर टाकलेली भाताची रोपे लावणीला आली असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक सुरुवात केल्याने काळजीत पडलेला बळीराजा पंधरा दिवसांच्या पावसाने सुखावला आहे. (latest marathi news)

In order to speed up the work of rice cultivation in Bhandardarawadi, farmers are harvesting rice by following the Japanese method.
Nashik ZP News : ‘सुपर 50’ उपक्रमात 5 हजार 700 विद्यार्थ्यांची नोंदणी

त्यामुळे वेळेत कामे उरकण्यात येत असून ट्रॅक्टरद्वारे मशागत करून शेत तयार केले जात आहे. दारणाकाठच्या गावांमध्ये इंद्रायणी व १००८ या जातीच्या भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासाठी शेतकरी शेतात रोपे तयार करतात. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी रासायनिक खते टाकली जातात.

"सध्याच्या परिस्थितीत भात लागवडीसाठी एकरी १० ते १५ हजाराचा खर्च येतो. जपानी पद्धतीने दोरी लावून लागवड केली जाते. खतगोळी पद्धतीने बुडालगत टाकली जाते. त्यामुळे खत वाहून न जाता उत्पादन वाढीस मदत होते. एकरी ३० ते ३५ पोते उत्पादन अपेक्षित असून, चार महिन्यांत पीक तयार होते." - संतोष भोईर, शेतकरी, वंजारवाडी

In order to speed up the work of rice cultivation in Bhandardarawadi, farmers are harvesting rice by following the Japanese method.
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.