खेडभैरव : निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदरा परिसरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे वातावरण नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असतात. सप्टेंबरच्या शेवटच्या सप्ताहापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत विविध प्रकारची रानफुले या भागात येत असल्याने ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांची या परिसरात गर्दी होत आहे. (Igatpuri Bhandardara area bloomed with wild flowers)
रानभेंडी, कारवी, टोपली कारवी, तेरडा, कळलावी, सोनकी, घडहान, दिवटा, धोटा,बफळी,आंबु,पलदा तसेच पिवळ्या रंगाची सोनकी व खुरासनी सारख्या रानफुलांमुळे घाटघर, रतनवाडी, भंडारदरा परिसराच्या सौंदर्यात भर पडत असून पर्यटक हा रानफुलांचा आनंद घेण्यासाठी परिसरात गर्दी करत आहे.
पावसाचा जोर काहीसा कमी होतो. सगळीकडे पावसाने राज्य केल्यामुळे हिरवळीने सह्याद्रीची पर्वतरांग नटून बसली आहे. हिरवाकच दिसणाऱ्या या हिरवळरुपी शालीला आता रानफुले व गवत फुलांनी विविध रंगाची झालर बसविली असून, अनेक प्रकारची निसर्गाची देणं असलेली फुले कळसूबाईच्या शिखरावर तसेच रतनगडाच्या सभोवताली थाटात डोलत आहेत.
सोनकळीच्या फुलांनी संपूर्ण जंगलाला सोन्याचा मुलामा चढविल्यागत भास होताना दिसत आहे. इगतपुरी व भंडारदऱ्याच्या परिसरात अनेक प्रकारची गवत फुले व रानफुलेही उगवली असून निसर्गाचा हा अद्भुत असा देखावा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. (latest marathi news)
रतनगडाच्या पायथ्याचा संपूर्ण परिसर रानफुलांनी बहरून गेला आहे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठी दरी समजल्या जाणाऱ्या सांदन दरीचा आनंद घेण्यासाठी आलेले शेकडो पर्यटक या फुलांची मनमोहक अदा आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहेत. यामध्ये काही फुलांचा वापर हा ठरावीक आजारावर औषधांसाठी केला जातो. रिंगरोडवर पर्यटन करताना कितीतरी लहान लहान मुले हातात रानफुले घेऊन पर्यटकांना विकत घेण्यासाठी आमंत्रण देतात.
"सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कळसूबाई परिसरातील डोंगर दऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांनी फुलून जातात हे दृश्य डोळ्यांना सुखावणारे असते. अनेक पर्यटक या परिसरात या फुलांचा आनंद घेण्यासाठी या परिसरात येत असतात." - नितीन शहा, स्थानिक, भंडारदरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.