Bhavali Dam : भावली धरण परिसरात जाण्यास मनाई! संततधार सुरू; दरड कोसळल्याने वाहतूक 2 तास ठप्प

Nashik News : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून संततधारेमुळे भावली येथील धबधब्यालगत असलेल्या डोंगरावरील दरड कोसळून रस्त्यावर आल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
A crack in the road next to the dam.
A crack in the road next to the dam.esakal
Updated on

Nashik News : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून संततधारेमुळे भावली येथील धबधब्यालगत असलेल्या डोंगरावरील दरड कोसळून रस्त्यावर आल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या परिसरात कोणतेही पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला. गुरुवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास भावली धरणालगत असलेल्या डोंगराच्या भागाची माती व दरड कोसळल्याने धरणाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. (Igatpuri Bhavali dam area prohibited)

या घटनेत पर्यटकांची जास्त गर्दी नसल्याने अनर्थ टळला. पावसाचा जोर वाढत असल्याने डोंगरावर लहान-मोठे धबधबे सुरू झाले असून, पाण्याच्या वाढत्या जोराने डोंगराची माती व झाडे कोसळत असताना दरडही कोसळत आहे.

या भागात जाणारे पर्यटक व ग्रामस्थांना, शाळकरी मुलांना या मार्गावरून जाण्या-येण्यास बंदी केल्याने अनेकांचा शहरात येण्याचा संपर्क दोन ते तीन तासांपासून तुटला होता. (latest marathi news)

A crack in the road next to the dam.
Nashik News : अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास बंदी! अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांचे आपत्ती विभागाला निर्देश

प्रशासनाने त्वरित उपाययोजना करत दरडी हटविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. भावली धरण तुडुंब भरल्याने पर्यटकांना या भागात जाण्यास इगतपुरी पोलिसांनी बंद केल्याच्या सूचना दिल्या असल्याचे पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी सांगितले.

A crack in the road next to the dam.
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.