Nashik : पर्यटनात अव्वल असलेल्या इगतपुरीत लालपरीची दैना... प्रवाशांच्या अभावी बस स्थानक मोजतोय अखेरच्या घटका

Nashik : नागरिकांचे हक्काचे ठिकाणी असलेल्या इगतपुरी शहरात प्रवासी वाहतुकीसाठी हक्काची असलेली लालपरी मात्र, पुरेशा प्रवाशांअभावी अखेरच्या घटका मोजत आहे.
silence bus station Dirty toilet near the bus station area.
silence bus station Dirty toilet near the bus station areaesakal
Updated on

इगतपुरी शहर : निसर्गाची भरपूर संपत्ती लाभल्याने पर्यटनासाठी राज्यातील नागरिकांचे हक्काचे ठिकाणी असलेल्या इगतपुरी शहरात प्रवासी वाहतुकीसाठी हक्काची असलेली लालपरी मात्र, पुरेशा प्रवाशांअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. इगतपुरी शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. परंतु, तालुक्याची अर्थवाहिनी घोटी बाजारपेठ असल्याने तालुक्याचे ठिकाण असूनही इगतपुरी बस आगार कायम घाट्यातच आहे. आदिवासी बांधवांना व शाळकरी मुलांना वाहतुकीसाठी फक्त येथील एसटीचा आधार आहे. पुरेशी प्रवासी संख्याच नसल्याने आणि अनेकांची खासगी वाहनांना पसंती असल्याने हे बसस्थानक डबघाईच्या मार्गावर म्हणणे वावगे ठरणार नाही. ( igatpuri bus station bad condition due to lack of passengers )

जुन्या बसेस अन्‌ मोजक्याच फेऱ्या

इगतपुरी ते घोटी ही नेहमीची वर्दळ ॲटोरिक्षानेच असती एका रिक्षात सहा ते सात प्रवासी कोंबून बसतात. मात्र, एसटीने जाणे पसंत करत नाही. त्यामुळे आगारातून दररोज २४ बसेस या ग्रामीण भागात फेऱ्या मारतात आणि १० ते १५ फेऱ्या कसारा इथे सेवा देतात. जादाकरुन ज्येष्ठ नागरिकच बसने प्रवास करतात. मोजक्या वेळेस क्वचित बसस्थानकात गर्दी असते.

ऐरवी बसस्थानकात नेहमी शुकशुकाट असतो. जेव्हा डेपोतून बस फलाटवर इतरत्र जाण्यासाठी उभे राहते. तेव्हा हाताच्या बोटावर मोजात येईल एतकेच प्रवासी बसमध्ये चढतात. तालुक्याचे ठिकाण असूनही बसस्थानकात बस उभ्या करण्यासाठी केवळ पाचच फलाट आहे. इगतपुरी बस स्थानक पाहता एखाद्या मोठ्या गावातील बस स्थानक चांगले आहे.

- प्रवाशांअभावी स्थानकात नेहमी शुकशुकाट

- स्वच्छतागृह, पाणपोई वापराविना पडून त्यामुळे घाणीचे साम्राज्य

- सर्व जुन्या बसेसमधून प्रवासी वाहतूक

- बसस्थानकात खड्ड्‌याचे साम्राज्य

- बसचे भाडे कमी असूनही घोटीला

- जाण्यासाठी रिक्षालाच पसंती

- फक्त विद्यार्थीं, ज्येष्ठ नागरिकांचा बसमधून प्रवास (latest marathi news)

silence bus station Dirty toilet near the bus station area.
Nashik Tribal Protest : आरक्षणप्रश्नी आदिवासी समाज आक्रमक; दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह घोटी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन

''इगतपुरी हे रेल्वेचे जंक्शन रेल्वे स्थानक असून येथील प्रवासी शक्यतो रेल्वेनेच प्रवास करत आहे. अनेक प्रवासी टॅक्सीने जाणे पसंत करतात. केवळ रात्री अपरात्री व पहाटे कसारा किंवा नाशिकहून यायचे असले तरच एसटीने प्रवास करतात. त्यामुळे महामंडळ डबघाईत चालले आहे. प्रवासी नसल्याने बस स्थानक नावालाच उरले आहे.''- रमेश शिंदे, स्थानिक

''पूर्वी इगतपुरी डेपोच्या बसेस या नाशिकहून सुटल्यानंतर इगतपुरी स्थानक, रेल्वे स्टेशन, राममंदिर, तीनलकडी पुल, जोगेश्वरी कॉलनी व महिंद्रा कंपनी पर्यंत येत असत. अशी सुविधा बस आगाराने पुन्हा सुरु केली तर प्रवाशी संख्या वाढू शकते.''- अजित पारख, व्यापारी.

''इगतपुरी आगारातुन दररोज २४ बसेस या ग्रामीण भागात फेऱ्या मारतात आणि १० ते १५ फेऱ्या कसारा इथे सेवा देत आहे तर पुणे, नंदुरबार, धुळे, शिरपुर नाशिक आदी ठिकाणी जातात व येतात तरी सर्व गावकऱ्यांची अशीच साथ भेटत राहिली तर इगतपुरी आगार आणि तसेच रा. प .महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेत प्रगती पथावर काम करत राहील.''- प्रणव आहिरे, आगार प्रमुख, इगतपुरी.

इगतपुरी बस आगाराचा तपशील

आगारातील एकूण बस - ४०

रोजच्या फेऱ्या - २५३

बाहेरील येणाऱ्या बसेस - २

एकूण कर्मचारी - २४१

लांब पल्ल्याच्या गाड्या - १४

silence bus station Dirty toilet near the bus station area.
Nashik Crime News : नाशिकमधून चोरलेल्या कारची परराज्यात विक्री; गुन्हेशाखेने आवळल्या संशयिताच्या मुसक्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.