Nashik Monsoon : इगतपुरी तालुक्यात धुव्वा‘धार’! 24 तासात 240 मिमी पावसाची नोंद

Monsoon : महाराष्ट्राची चेरापुंजी व पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यात वरुणराजाने गेल्या चार दिवसांपासून दिवस-रात्र संततधार सुरुच ठेवली आहे.
Rainwater entering the house here. In the second photo, waterfalls and mist flowing near the railway tunnel in Kasara Ghat.
Rainwater entering the house here. In the second photo, waterfalls and mist flowing near the railway tunnel in Kasara Ghat.esakal
Updated on

Nashik Monsoon : महाराष्ट्राची चेरापुंजी व पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यात वरुणराजाने गेल्या चार दिवसांपासून दिवस-रात्र संततधार सुरुच ठेवली आहे. शनिवारी (ता. ३) झालेल्या मुसळधार पावसाने २४ तासात २४० मिमी इतकी विक्रमी नोंद झाली. रविवारी (ता. ४) शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक आनंद घेण्यासाठी आले. मात्र, पावसाचा जोर पाहून कोणीही बाहेर पडले नाही. ( Igatpuri taluka heavy rain recorded 240 mm of rain in 24 hours )

कसारा ते इगतपुरी या राष्ट्रीय महामार्गावर धुक्याची चादर व संततधार पावसामुळे वाहने संथगतीने धावली. मध्य रेल्वेच्या लाईन व बोगदा परिसरात कोणतीही घटना घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे पथक लक्ष ठेवून होते. या पावसामुळे भाम धरणाजवळील दरेवाडीतील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांची चांगलेच हाल झाले. ही माहिती समजताच आमदार हिरामण खोसकर यांनी भाम धरणाजवळ पुनर्वसन केलेल्या दरेवाडीत पाहणी दौरा केला. (latest marathi news)

Rainwater entering the house here. In the second photo, waterfalls and mist flowing near the railway tunnel in Kasara Ghat.
Nashik Monsoon : सिन्नर तालुक्यातील दुसरे कोनांबे धरण भरले; देवनदी प्रवाहित

यावेळी दरेवाडी व पत्र्याच्या वाडीतील ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. तालुक्यातील भाम धरणाने नव्याने पुनर्वसित झालेल्या भामनगर या ठिकाणी ४० कुटुंबाची वस्ती आहे. भामनगरचे पुनर्वसन करण्यात आले त्याचवेळी भामनगरच्या नाले-गटारांचे काम अजून जैसे-थेच आहे. गेल्या पाच वर्षापासून भामनगर (दरेवाडी) गावालगतचा नाला बांधण्यात यावा, अशी मागणी नागरीकांनी केली होती.

दरम्यान, पावसाचे पाणी शिरलेल्या घरांची पाहणी केली असता जवळच नाला तुंबल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार खोसकर यांनी पुनर्वसनच्या संबंधित अधिकाऱ्यांना नाल्यातील गाळ काढण्याच्या सूचना केल्या. तसेच, पुनर्वसनची अनेक कामे बाकी असल्याने येथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेऊन पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या समस्या येत्या आठ दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन आमदार खोसकर यांनी ग्रामस्थांना दिले.

Rainwater entering the house here. In the second photo, waterfalls and mist flowing near the railway tunnel in Kasara Ghat.
Nashik Monsoon : नार-पार, तान-मान, अंबिका नद्यांना पूर; सुरगाणा तालुक्यात धुव्वाधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.