Igatpuri Tourism : इगतपुरी तालुक्याला पर्यटन विकासाची आस! पर्यटनस्थळाचा दर्जा अन चालना मिळण्याची गरज

Latest Nashik Tourism News : अनेक गड, किल्ले आणि ऐतिहासिक वारसा आहे, आध्यात्मिक केंद्र आहेत,जागतिक दर्जाचे विपश्यना केंद्र आहे. एवढेच नव्हेतर निसर्गाची विपुलता असलेल्या या तालुक्याला पर्यटन विकासाची आस लागून आहे.
Igatpuri Tourism
Igatpuri Tourismesakal
Updated on

इगतपुरी : निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या इगतपुरीला पर्यटनाचे तालुका देखील म्हणूनही ओळखले जाते. अनेक गड, किल्ले आणि ऐतिहासिक वारसा आहे, आध्यात्मिक केंद्र आहेत,जागतिक दर्जाचे विपश्यना केंद्र आहे. एवढेच नव्हेतर निसर्गाची विपुलता असलेल्या या तालुक्याला पर्यटन विकासाची आस लागून आहे. (Igatpuri taluka hopes for tourism development)

पर्यटकांचा ओढ इगतपुरी तालुक्याकडे असतो.बाराही महिने या तालुक्यात पर्यटकांची गर्दी असते. पर्यटन,पाणी हे इगतपुरी तालुक्याचे समीकरण ठरले आहे. मात्र त्या तुलनेत पर्यटनस्थळाचा ज्या प्रमाणात विकास होणे अपेक्षित होते. त्या प्रमाणे झाले नाही.एका बाजूला पर्यटनाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फक्त आश्वासनांची खैरात व घोषणांचा पाऊस पाडला जातो. मात्र,पर्यटनस्थळाचा केंद्र असलेल्या या तालुक्यातही उणीव दिसत आहे.

माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी महाबळेश्वरच्या धर्तीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटनाचा विकास करण्याबाबत सूचित केले . माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बऱ्याच वेळा भावली धरणासह विविध भागाला भेटी भेट देऊन धरण स्थळांसह अनेक प्रकल्प राबविण्याचा मानस केला होता. मात्र,अद्यापपर्यत याबाबतची जाणीवही या पर्यटनस्थळावर झाली नाही.

विशेष म्हणजे समृद्धी आणि संपन्नतेची भव्यता असलेल्या तालुक्यात जगातून येणाऱ्या भाविकांसाठी विपश्यना केंद्र,तालुक्याच्या सीमेवर राज्यातील उंच शिखर, दहा ते पंधरा मोठं मोठी धरणे ही आहेत. त्यामुळे पर्यटन विभागाने या तालुक्यावर लक्ष केंद्रित करणे सध्या तरी आवश्यक आहे. (latest marathi news)

Igatpuri Tourism
Ladakh Tourism : भारतातील या खेडेगावात युरोपियन तरुणी गर्भवती होण्यासाठी येतात, काय आहे कारण ?

प्रेक्षणीय स्थळं

आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र, रेल्वेचा बोगदा,हिवाळी ब्रीज,कसारा घाट, उंटदरी, त्रिंगलवाडीचा ऐतिहासिक किल्ला,भावली धरण व धबधबा,भंडारदरा धरण,रंधा फॉल, अंब्रेला फॉल,कोकणकडा, सांधनदरी, घाटघर प्रकल्प,रतनगड,सर्वोच्च शिखर कळसुबाई, हरीश्‍चंद्रगड, कुलंग,मलंग किल्ला, फोपसंडीचा निसर्ग,वैतरणा विद्युत प्रकल्प ,कावनाई किल्ला,कावनई सिंहस्य क्षेत्र, सर्वतीर्थ टाकेद व इत्यादी

"महाराष्ट्राची चेरापुंजी व धरणांचा तसेच गड किल्ल्याचा तालुका म्हणून इगतपुरी राज्याच्या नकाशावर आहे. मात्र येथील गड किल्ले धरणे अजून ही सुख सुविधांपासून वंचित आहे. येथे लघु उद्योग होणे गरजेचे आहे जेणेकरून स्थानिक माणसाला रोजगार उपलब्ध होईल."

- भगीरथ मराडे - ट्रेकर इगतपुरी

"तालुक्यातील एकूण जमिनीपैकी ७२ टक्के जमीन शासनाने औद्योगिक वसाहत,लोहमार्ग,महामार्ग,वनजमीन,आर्मी सराव,समृद्धी महामार्ग अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना घेतल्या आहेत. त्यामुळेच शेतकरी रस्त्यावर आला व बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हाकेच्या अंतरावरील मुंबईची गुंडगिरी इथपर्यंत पोहोचली आहे. यावर ठोस धोरण व्हावे."- पांडुरंग वारुंगसे ,माजी उपसभापती ,इगतपुर

Igatpuri Tourism
Jalgaon Tourism: ‘पर्यटन विकास’अंतर्गत वर्षभरात निधीत भरीव वाढ! जिल्ह्यातील 10 वर्षांच्या तुलनेतील स्थिती; कामेही वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.