Nashik Igatpuri Tourism: पर्यटनाला खुणावतोय इगतपुरी तालुका! सगळीकडे हिरवा शालू पांघरल्याचे चित्र, धबधब्यातून वाहतेय नितळ पाणी

Nashik News : धार्मिक, पौराणिक व शिवकालीन वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यास निसर्गाचेही मुक्तहस्ते वरदान लाभलेले आहे.
Fresh water falls in Chinchalekhair area due to recent rains in the taluka.
Fresh water falls in Chinchalekhair area due to recent rains in the taluka.esakal
Updated on

इगतपुरी : ‘हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे, या मखमालीवरती फुलराणीही खेळत होती,’ या कवितेला समर्पक असे वातावरण इगतपुरी तालुक्यात सध्या पाहावयास मिळत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या इगतपुरी तालुक्यात अखंडपणे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुक्के व वेगाने वाहणारे वारे, पावसामुळे संपूर्ण तालुक्यात हिरवागार गालीचा, हिरवाईने नटलेले डोंगर, पावसाच्या ढगाच्या दुलईत शिरलेली शिखरे व कडेकपारीतून वाहत येणाऱ्या निर्झराचे उंचावरून पडणारे धबधबे, असे मनमोहक चित्र सध्या इगतपुरी तालुक्यात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

असे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील नगर परिषद तलाव, भावली धरण, वैतरणा धरण, त्रिंगलवाडी किल्ला, कसारा घाटासह घाटनदेवी, खोडाळा रस्ता व घोटी- सिन्नर-भंडारदरा रस्त्यावर पर्यटकाची एकच गर्दी होत आहे. निसर्गाची अनुभूतू अनुभवण्यास आलेला प्रत्येक पर्यटक तालुक्यातील निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवून भारावून जात आहे. (Igatpuri taluka marking tourism attraction increasing tourists)

धार्मिक, पौराणिक व शिवकालीन वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यास निसर्गाचेही मुक्तहस्ते वरदान लाभलेले आहे. तालुक्यात टाकेद, कावनई, खेड या धार्मिक स्थळांबरोबर जागतिक दर्जाचे विपश्यना केंद्रामुळे तालुक्याची संपूर्ण जगात एक नवी ओळख झाली आहे.

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेला हा तालुका राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग यांच्यामुळे सर्व प्रमुख शहरांशी जोडला गेला आहे. या तालुक्याच्या चारही बाजूला असलेले अलंग, मलंग, कुलंग व कावनई किल्ले इतिहासाची साक्ष म्हणून आजही दिमाखात उभे आहेत.

महाराष्ट्राच्या राजधानीपासून तालुक्यात आल्यावर सह्याद्रीच्या कुशीतील थळघाट चढून वर आले, की थंड वाऱ्याची चाहूल लागते. येथून समोर दिसते सह्याद्रीची विस्तीर्ण रांग. पावसामुळे हिरवा शालू पसरलेला असून, उंच डोंगरावरून खोल कपारीत कोसळणारे धबधबे आणि फेसाळणाऱ्या पाण्यातून पुन्हा आकाशाकडे झेपावणारे पाण्याचे तुषार.

याच तुषारावर सूर्यकिरणांचा संपर्क आला तर त्यातून डोकावणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य, असा नयनमनोहर दृश्य तालुक्यातील घाटमाथ्यासह सर्वच ठिकाणी अनुभवयास मिळते. हौशी पर्यटक व गिर्यारोहक निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवण्यासाठी तालुक्यात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. (latest marathi news)

Fresh water falls in Chinchalekhair area due to recent rains in the taluka.
Kini Toll Plaza : 'खर्डा-भाकरी घेऊन आलोय, आता टोल बंद केल्याशिवाय मागं हटणार नाही'; आमदार सतेज पाटलांचा इशारा

मनमोहक भावली धबधबा

महामार्गावरील पिंप्री फाट्यापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर भावली धरण आणि खळखळ वाहनारे धबधबे म्हणजे स्वर्गाची अनुभूती आहे. याच रस्त्यावर पुढे कुरुंगवाडी असून, येथील सौंदर्य शब्दांत न सांगण्यासारखे आहे. भावली धरण परिसरात व मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक लहान मोठी होटेल्स, रिसोर्ट आहेत. इगतपुरी नगर परिषद तलावाजवळील धबधबा तर इगतपुरी रेल्वेस्थानकापासून अगदी पायी वीस मिनिटांच्या अंतरावर आहे.

पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

इगतपुरीसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र सुरक्षेबाबत कोणतीही यंत्रणा सतर्क नसल्याचे वैतरणा, दारणा, भावली, भंडारदरा, त्रिंगलवाडी आदी ठिकाणी दिसून येत आहे. धरणं सध्या पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर असून, या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना होणे आवश्यक आहे.

Fresh water falls in Chinchalekhair area due to recent rains in the taluka.
Nashik Ajit Pawar News : ‘वसाका’ बाबत लवकरच मार्ग काढणार : अजित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.