Nashik News : गोहरणच्या खडी क्रशर प्लांटमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’!

Nashik News : गोहरण (ता. चांदवड) येथील बेकायदेशीरपणे सुरू असलेला खडी क्रशर प्लांट ‘सील’ करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही रात्रभर चालविला जात आहे.
stone crusher plant
stone crusher plantesakal
Updated on

नाशिक : गोहरण (ता. चांदवड) येथील बेकायदेशीरपणे सुरू असलेला खडी क्रशर प्लांट ‘सील’ करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही रात्रभर चालविला जात आहे. याविषयीचे व्हिडिओ समोर आल्यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत. (Nashik illegal gravel crusher plant at Goharan Chandwad being run all night news)

गोहरण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नितीन गुंजाळ, सचिन अग्रवाल व नितीन आहेर यांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक २१८/३ मध्ये उत्खनन करण्यात आले. याविषयी थेट जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

तहसीलदारांनी येथील खडी क्रशरची पाहणी करीत ते ‘सील’ केले आहे. पण, ही कारवाई निव्वळ फार्स ठरली असून, काही दिवसांत खडी क्रशर प्लांट रात्री अकराला सुरू होतो आणि पहाटे पाचपर्यंत चालविला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याविषयी व्हिडिओ तयार करून कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.  (latest marathi news)

stone crusher plant
Pune Crime News : पैसे देण्यास नकार दिल्यावरून हॉटेलचालकावर चालवली गोळी, पुण्यात तीन दिवसांत तिसरा गोळीबार

कारवाई निव्वळ फार्स

तहसीलदारांनी खडी क्रशर ‘सील’ करताना मशिनची चाके ‘सील’ करणे अपेक्षित आहे. पण, इलेक्ट्रिक बोर्ड ‘सील’ करून कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी भासविले. प्रत्यक्षात दुसरीकडून वीजजोडणी घेऊन सर्रासपणे हे क्रशर चालविले जात आहे. त्यामुळे अगोदर झालेली कारवाई ही निव्वळ फार्स ठरली का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

stone crusher plant
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.